Join us

Grape Farming : द्राक्षातील घड लूज का पडतात? त्यावर उपाय काय? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:20 IST

Grape Farming : एकीकडे द्राक्ष हंगामाला (Grape Season) सुरुवात झाली असून अशा स्थितीत द्राक्ष घड मलूल पडताना दिसून येतात.

Grape Farming : हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा बागेमध्ये जास्त पाणी द्यावे लागते. वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये बागेला पाणी (Water Management) किती लागेल, याचा अंदाज शेतकऱ्यांना न आल्यास मण्याच्या वाढीसाठी (Draksh Bag) आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही. परिणामी मणी लूज पडताना दिसून येतात. 

तर भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इथे पाणी थोडेफार जरी जास्त झाले, तरी आर्द्रता वाढेल. त्यानंतर डाऊनी मिल्ड्यूच्या सुप्तावस्थेत असलेल्या बीजाणूंना अनुकूल वातावरण तयार होते. परिणामी, आधी आवाक्यात वाटत असलेल्या डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळेही मणी लूज पडताना दिसून येतात. 

काही परिस्थितीत बागेतील अन्नद्रव्यांच्या बिघडलेल्या संतुलनामुळे मणी लूज पडताना दिसून येतात. यात विशेषतः कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांची कमतरता, याआधी दिलेले पाणी आणि वाढीची अवस्था यांचा समतोल ढासळल्यासही मणी तूज पडण्याची समस्या दिसून येते. यापैकी आपल्या बागेत कोणती परिस्थिती आहे, हे पाहावे. त्यानुसार काही उपाययोजना कराव्या लागतील. मात्र मणी लूज पडण्याची समस्या टाळण्यासाठी पाण्याचा संतुलित वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.

उपाययोजना

  • ज्या बागेत पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी बोदावर मल्चिंग करून घ्यावे.
  • वेलीवर ताण कमी करण्यासाठी अॅण्टीस्ट्रेस रसायनाची ३.४ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
  • त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारे पानातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.
  • फळकाढणीच्या अवस्थेतील बागेत यावेळी अन्नद्रव्यांच्या वापराचा फारसा उपयोग होत नसला, तरी कॅल्शिअमची फवारणी थोड्याफार प्रमाणात मदत करेल.

 

- ग्रामीण कृषि मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेती