Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : द्राक्ष आणि डाळिंब बागांवरील 'ही' दोन महत्वाची कामे करून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:15 IST

Agriculture News : द्राक्ष बागेवरील खोडकिडीचे व्यवस्थापन आणि डाळिंब बागेचे लेप लावण्याची प्रक्रिया कशी करावी, हे समजून घेऊयात... 

Agriculture News : सद्यस्थितीत द्राक्ष बागेवर (Grape Farming) स्ट्रोमॅशिअम बारबॅटम या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर दुसरीकडे डाळिंब बागेच्या (Dalimb Bag) खोडावर लेप लावण्याचे काम सुरु आहे. द्राक्ष बागेवरील खोडकिडीचे व्यवस्थापन आणि डाळिंब बागेचे लेप लावण्याची प्रक्रिया कशी करावी, हे समजून घेऊयात... 

द्राक्ष पिकामध्ये (Grape Crop) पूर्वी दुय्यम स्वरूपाची असलेली स्ट्रोमॅशिअम बारबॅटम ही खोडकीड आता प्रमुख किडींपैकी एक झाली आहे. सुरुवातीस केवळ जुन्या बागांमध्ये ही कीड आढळत असल्याने द्राक्ष बागायतदार या किडीचा जास्त विचार करत नसत. मात्र या किडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.

द्राक्ष : स्टोमॅशिअम बारबॅटम खोडकिडीचे व्यवस्थापनजून महिन्याच्या सुरवातीपासूनच द्राक्षबागेबाहेर एकरी १ प्रकाश सापळा लावावा.सापळ्यात हे भुंगेरे सापडू लागल्यानंतर फवारणीचे नियोजन करावे. १ ते २० जून या कलावधीत निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडुनिंब पानांचा अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २.३ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाच ते सहावेळा मुख्य खोड आणि ओलांड्यावर फवारण्या कराव्यात.

डाळिंब : खोडावर लेप लावणेदोन वर्षांपुढील बागेत बहार घेण्यापूर्वी, फळांची काढणी झाल्यानंतर जमिनीपासून दोन फुटांपर्यंत खोडावर/फांदीवर खालीलप्रमाणे लेप लावावा.लाल माती ४ किलो अधिक इमामेक्टिन बेंझोएट (५% एसजी) २० ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वरील लेप १० टक्के बोर्डो मिश्रणासोबत फेरपालट करून वापरावा.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेडाळिंबशेती क्षेत्रशेती