Join us
Daily Top 2Weekly Top 5

गहू साठवणूक करण्यापूर्वी हे करा, वर्षभर गव्हाला कीड लागणार नाही, वाचा पाच प्रभावी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:25 IST

Gahu Sathavnuk : गव्हाची साठवणूक सुरू असून अशा काळात कीड लागण्याचे प्रमाण वाढते, अशावेळी काय करावे?

Gahu Sathavnuk :   साठवणूकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे. त्यासाठी मळणीनंतर गव्हास तीन ते चार दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड होऊ द्यावा. त्यानंतर साठवण करावी. 

शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा. गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी. 

गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा. पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथीनच्या शीटवर ठेवावीत.

गव्हाला कीड लागण्यापासून वाचवण्याचे प्रभावी उपाय : 

  • कडक ऊन : गहू साठवण्यापूर्वी तो कडक उन्हात वाळवून त्यातील आर्द्रता कमी करा. 
  • कडुलिंबाचा पाला : वाळलेल्या कडुलिंबाची पाने गव्हाच्या डब्यात टाकल्याने कीड दूर राहते. 
  • हिंग/लवंग : हिंगाची पुरचुंडी किंवा लवंग डब्यात ठेवल्यास त्यांच्या तीव्र वासामुळे कीटक येत नाहीत.
  • एरंडीचे तेल : काही लोक गव्हाला एरंडीचे तेल लावून साठवतात, ज्यामुळे कीड लागत नाही.
  • हवा-बंद साठवणूक : गहू हवाबंद डब्यात (मेटल कंटेनर सर्वोत्तम) साठवावा. 
  • सुरक्षित जागा : गहू ओलावा नसलेल्या, कोरड्या जागी साठवावा. 

 

कीड लागली असल्यास काय करावे?जर गव्हाला कीड लागली असेल, तर तो उन्हात वाळवून, चाळून पुन्हा साठवावा किंवा बोरिक पावडरचा वापर करावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Effective methods to prevent pests in stored wheat for a year.

Web Summary : Dry wheat thoroughly before storing. Use neem leaves, cloves, or airtight containers. Store in a dry place. If infested, dry in the sun or use boric powder.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूकाढणीशेती