Join us

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाहीत? असे करा ऑनलाईन चेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:06 IST

ladki bahin yojana अनेक महिलांनी निवडणुकीपूर्वी अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले, परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही, अशा महिलांनी पुढे काय करायचं?

अनेक महिलांनी निवडणुकीपूर्वी अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले, परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही, अशा महिलांनी पुढे काय करायचं?

महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्यांना या योजनेचा पैसा मिळणार नाही. त्यासाठी महिलांना आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे लागेल.

आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच बँक खात्यावर पैसे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करताना बँक खाते क्रमांक टाकून पासबुक अॅपलोड केले.- मात्र, हे बँक खाते आधारशी लिंक नव्हते, तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते.- त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले.

आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे कसे पहावे?

  • बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • तसे नसल्यास महिलांना लाभ मिळत नाही. त्यासाठी महिलांनी आपले 'बँक सिडिंग' स्टेटस चेक करावे.
  • बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉगीन करा.
  • त्यांनतर आधार सिडिंग स्टेटस मध्ये जा.
  • यात तुम्हाला तुमचे आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल.
  • त्यानंतर तुम्ही इथे जी बँक दाखवत त्या बँकेत पैसे आलेत का ते पहा.
  • आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करणे जरुरीचे आहे.
  • त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.

अधिक वाचा: PAN 2.0 : तुमच्या पॅन कार्डमध्ये होणार हे मोठे बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प वाचा सविस्तर

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचाआधार कार्डबँकराज्य सरकारसरकारमहिला