Join us

नवीन हरभऱ्याला मिळतोय एवढा भाव, राज्यात काय आहे स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:13 AM

जवळा बाजारमध्ये नवीन हरभऱ्याला ५८०० रुपयांचा मिळतोय भाव

जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन हरभरा विक्री सुरू झाली आहे. सुरुवातीला बाजारपेठेत हरभऱ्याला ६२०० रुपये भाव मिळत होता. मात्र, आवक वाढताच हरभऱ्याचा भाव पुन्हा ४०० रुपयांनी उतरला आहे. सद्य:स्थितीत ५८०० रुपये दराने हरभरा खरेदी सुरू आहे.

जवळा बाजारसह परिसरातील जवळपास ५० गावांतील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणत असतात. यावर्षी मात्र सर्व पिकांचे भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच नगदी पीक असलेल्या सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला घरात ठेवणे पसंत केले आहे. जोपर्यंत सोयाबीनला भाव मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन घरीच ठेवले जाईल, असेही शेतकरी सांगत आहेत.

तसेच यावर्षी कापसाचेही भाव कमी झाले आहेत. त्यामुळे तर शेतकरीवर्ग कापूसही घरीच ठेवत आहेत.शासनाने शेतीमालाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी अनेकवेळा शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु, रब्बी हंगाम संपायला आला तरी भाव मात्र दिला जात नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग संताप व्यक्त करीत आहेत.हरभऱ्यामध्ये झाली चारशे रुपयांची घट

यावर्षी सुरुवातीला हरभयाला ६२०० रुपये भाव मिळाला. मात्र, त्यानंतर हरभऱ्याची आवक वाढताच चारशे रुपयांनी घट झाली. सध्या पाच हजार ८०० रुपये या भावाने हरभरा खरेदी केला जात आहे. सध्या तरी हरभऱ्याला चांगला भाव असल्यामुळे शेतकरी हरभरा बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे. हरभच्यास योग्य भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

राज्यात हरभऱ्याला काय मिळतोय भाव?

20-02-24

 

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हा

जात/प्रत

आवक

कमीत कमी दर

सर्वसाधारण दर

अहमदनगर

---

50

4823

5500

अहमदनगर

लोकल

261

5400

5723

अहमदनगर

लाल

17

5500

5500

अकोला

लोकल

1793

5355

5975

अकोला

काबुली

1

12500

12500

अमरावती

लोकल

1011

5450

5670

बीड

लोकल

32

5700

5740

बीड

लाल

80

5760

5770

भंडारा

काट्या

1

5700

5700

बुलढाणा

लोकल

192

4750

5000

बुलढाणा

चाफा

538

5020

5403

चंद्रपुर

---

325

5465

5530

चंद्रपुर

लोकल

1256

5500

5600

चंद्रपुर

लाल

1674

5200

5500

धाराशिव

काट्या

75

5801

5801

धाराशिव

लाल

76

5500

5875

धुळे

---

167

4000

5700

धुळे

चाफा

6

5100

5111

धुळे

बोल्ड

56

8850

9200

हिंगोली

---

405

5500

5745

हिंगोली

लोकल

103

5100

5200

जळगाव

---

18

4500

4811

जळगाव

लोकल

50

4790

5390

जळगाव

हायब्रीड

100

5420

5605

जळगाव

चाफा

321

5350

5690

जळगाव

लाल

159

6115

6300

जळगाव

काबुली

58

6200

6300

जळगाव

बोल्ड

10

7800

7800

जालना

लोकल

1729

4700

5150

जालना

काबुली

20

8811

8811

लातूर

लाल

6783

5720

6231

मंबई

लोकल

1841

4400

7300

नागपूर

लोकल

10133

4900

5546

नांदेड

---

20

5580

5600

नांदेड

लोकल

26

5540

5660

नंदुरबार

---

651

6951

8711

नाशिक

---

6

6376

6376

नाशिक

लोकल

582

5180

5613

नाशिक

हायब्रीड

20

5470

6000

नाशिक

काट्या

25

4870

5570

परभणी

लोकल

150

5300

5500

परभणी

गरडा

41

5400

5500

पुणे

---

42

6400

6900

पुणे

लाल

94

4500

5300

सोलापूर

---

90

5700

5800

सोलापूर

लोकल

38

6100

6400

सोलापूर

हायब्रीड

85

5400

5500

सोलापूर

गरडा

89

5500

5900

ठाणे

हायब्रीड

3

5600

5900

वर्धा

लोकल

663

5050

5310

वर्धा

लाल

231

5000

5400

वाशिम

---

2200

5000

5450

वाशिम

लोकल

1627

4900

5600

वाशिम

चाफा

3000

5350

5500

यवतमाळ

लोकल

1070

5208

5432

यवतमाळ

लाल

330

4625

4700

राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)

40424

 
टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड