Join us

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात आवक येताच हळदीचे दर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:03 AM

गुढीपाडव्याला दर समाधानकारक मिळाल्याने आवक वाढली आणि सोबत बाजार दर ढासाळले

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळद १९ हजारांवर पोहोचली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी मोंढ्यात आवक वाढताच हळदीला १६ हजार ३०५ रुपयांचा दर मिळाला. आवक वाढताच २ हजार ७०० रुपयांनी दर कमी झाले. दरात तेजी- मंदी येत असल्याने हळद ठेवावी की विकावी, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोंढ्यात पाडव्याच्या मुहूर्तावर ९ एप्रिल रोजी हळद कांडीस प्रतिक्विंटल १९ हजार दर मिळाला असून, आवकही चांगली होती. १० एप्रिल रोजी मोंढ्यात १० हजार कट्ट्याची आवक आली होती. बिटात दर्जेदार हळद कांडीस १६ हजार ३०५ रुपयांचा दर मिळाला. १४ हजार ८६६ हळदीचे सरासरी दर राहिले. मोंढ्यात आवक वाढताच हळदीच्या दरात घसरण झाली आहे.

दिनांक १० बुधवार रोजी राज्यातील हळद आवक व बाजारदर  

शेतमाल : हळद/ हळकुंड

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2024
रिसोड---क्विंटल8001129001487513887
वाशीम - अनसींगहायब्रीडक्विंटल600135001570014500
मुंबईलोकलक्विंटल19160002200019000
जिंतूरनं. १क्विंटल5146001460014600
सांगलीराजापुरीक्विंटल20211150002150018250
टॅग्स :बाजारहिंगोलीशेतकरीशेतीपीक