Join us

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक दर, उर्वरित बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 1, 2024 14:29 IST

राज्यात पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या काढणीला आता वेग आला आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या गव्हाच्या काढणीला आता वेग आला आहे. शिवाय अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी काळजी घेत असून बाजारपेठेत गव्हाची आवकही हळूहळू होत आहे.

दरम्यान, आज पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे ४६०० रुपयांचा दर मिळत आहे. आज पुणे बाजार समितीत ४३३ क्विंटल शरबती गव्हाची आवक झाली. यावेळी ५२०० रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर मिळत होता. आज सर्वाधिक आवक नागपूर बाजारसमितीत झाली असून शरबती गव्हाला साधारण ३४०० रुपयांचा भाव मिळत आहे. 

राज्यात सकाळच्या सत्रात २०८२ क्विंटल गव्हाची आवक होत आहे. सर्वसाधारण दर २००० ते ४६०० रुपयांपर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळत असून विदर्भातील अकोला व पश्चिम महाराष्ट्रातील पालघर बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ११५ क्विंटल गव्हची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण ३२०० ते ३०४५ रुपयांचा भाव मिळत आहे.

टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड