Join us

Summer Season : पारंपरिक मसाला बनवायची घरोघरी लगबग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:41 IST

Summer Season : भारतामध्ये मसाल्यांचा वापर खूप प्राचीन काळापासून केला जातो, आणि ते केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे, तर औषधी आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. मसाले (masala) जेवणाला रंग, सुगंध आणि चव देतात, तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने फायद्याशीर ठरतात.

Summer Season : भारतामध्ये मसाल्यांचा वापर खूप प्राचीन काळापासून केला जातो, आणि ते केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे, तर औषधी आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. मसाले (masala) जेवणाला रंग, सुगंध आणि चव देतात, तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने फायद्याशीर ठरतात.

उन्हाळा (Summer Season) सुरू होताच घरोघरी वळवणाचे पदार्थ तयार केले जातात. त्याच्याच जोडीला लाल मिरची, हळद आणि गरम मसाला (masala) तयार करण्याचे लगबग सुरू होते.

दररोजच्या जेवणासाठी लागणारा लाल मसाला (masala) हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला, आगरी-कोळी, गरम मसाला असे विविध प्रकारचे मसाले आहेत.

वर्षभराची साठवणूक करण्याकडे महिलावर्गाचा कल जास्त असतो. सध्या हंगाम सुरू झाल्याने लाल मिरचीचे भाव कमी झाले आहेत. यात शंकेश्वरी, बेडगी, तेजालवंगी आदी जातीच्या मिरची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.

सध्या धने, जिऱ्याचे दरही स्थिर असल्याने गरम मसाला बनविणे काहीसे स्वस्त झाले आहे. यामुळे महिलावर्ग गरम मसाला (masala) बनविण्यासाठी लागणारे पदार्थ खरेदी करताना दिसत आहेत.

सधारणत: होळी झाल्यानंतर मसाला करण्याची तयारी सुरू होते. या मागील उद्देश असा असतो की, लाल मिरची, मसाला (masala) तयार करण्याचे साहित्याला उन्हात वाळवून नंतर ते दळले जाते. यामुळे ते वर्षभर टिकते. मसाले बनवणे ही केवळ एक प्रक्रिया नाही, तर ती एक परंपरा आहे, जी ग्रामीण भागात घराघरात जपली जाते.

मसाला बनविण्याचा काळ

मसाला बनविण्यासाठी कोणताही विशिष्ट काळ नाही. परंतु, बहुतांश ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांतच मसाला (masala) बनविण्याला पसंती देतात. या दिवसांत मिरचीसह इतर वस्तूंचा हंगाम असतो. त्यामुळे मसाले बनविता येतात.

गरम मसाला आरोग्यदायी

कोणत्याही भाजीची कल्पना ही गरम मसाल्याशिवाय करणेही काही जणांना शक्य होत नाही. बहुतांश स्वयंपाक घरात गरम मसाला असतोच. त्याचे ठराविक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यदायी आहे.

मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लॅमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.

मसाला आता नाही बनवणार तर केव्हा!

उन्हाळ्याच्या दिवसांत मिरचीसह इतर लागणाऱ्या वस्तूंचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे या दिवसांत मसाला बनविणे सोयीचे ठरते.

बडीशेपही स्वस्त

मागील दोन महिन्याच्या तुलनेत सध्या बडीशेपचे दरही उतरले आहेत. मसाल्यामध्ये बडीशेपचा वापर करण्यात येतो.

रेडिमेड मसाल्यात भेसळीचीही शक्यता

अलिकडच्या काळात खद्यपदार्थात भेसळीची शक्यता वाढत चालली आहे. भेसळयुक्त मसाले खाण्यात आल्यास आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे बहुतांश जण रेडिमेड मसाले टाळतात. घरगुती मसाल्याला पसंती दिली जाते.

असे आहेत मसल्याचे दर

वस्तूदर (प्रतिकिलो)
लाल मिरची१५०
धने१४०
बडीशेप३००
जिरे२६०
लवंग१०००
काळीमिरी८००
दालचिनी३५०
दगडफूल७००
तेजपत्ता२५०
मसाला वेलची३५००

हे ही वाचा सविस्तर : Dairy Farming : पशुपालकांचे आर्थिक गणित असते तरी काय जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमहिलाबाजार