Join us

Soybean rates today: हिंगोलीसह धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनला सकाळच्या सत्रात असा मिळतोय बाजारभाव

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 3, 2024 14:06 IST

soybean Market Maharashtra: अमरावती बाजारसमितीत सर्वाधिक आवक, बाजारभाव काय मिळतोय?

राज्यात आज एकूण ६ हजार ८४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सकाळच्या सत्रात आज हिंगोलीसह धाराशिव बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला क्विंटलमागे ४३०० ते ४४०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

अमरावती बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ६३५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी सोयाबीनला क्विंटलमागे ४३५० रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाने नोंदवले.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/06/2024
अमरावतीलोकल6351430044004350
धाराशिवपिवळा16440044504400
हिंगोलीपिवळा97425043504300
नागपूरलोकल254410044504363
परभणीपिवळा130443045004448
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6848

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड