Join us

Soybean Market सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर; बाजारभावात होईल का बदल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 3:59 PM

गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन निघाल्यावर थोडे दिवस पाच हजारांच्या पुढे प्रती क्विंटलचे भाव गेले होते. त्यानंतर आता जवळपास दहा ते अकरा महिने होऊन गेले तरी क्विंटलच्या दरात अपेक्षित वाढ होत नाही.

यावर्षीचा खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी सोयाबीनचे भाव पडलेलेच असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. केंद्राच्या हमी भावाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात फरक पडत नसल्याने सर्व पिकाचे हमीभाव वाढवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन निघाल्यावर थोडे दिवस पाच हजारांच्या पुढे प्रती क्विंटलचे भाव गेले होते. त्यानंतर आता जवळपास दहा ते अकरा महिने होऊन गेले तरी क्विंटलच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

खरीप अथवा रब्बीतील माल निघाल्यावर शेतकरी काही दिवस घरीच ठेवतात. भाव वाढल्यावरच त्याची विक्री करतात. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतलेले होते. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. ५००० ते ५२०० क्विंटलला सोयाबीनचे दर त्यावेळी होते.

त्यानंतर दर वाढलेच नाहीत. दर वाढेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरी ठेवलेले आहे; पण त्याचा त्यांना फायदा होईल, असे वाटत नाही. आता अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची आशा सोडून देऊन सोयाबीन विकण्याची तयारी केली आहे.

काही शेतकरी सोयाबीनचा वापर बियाण्यांसाठी करणार असले तरी सर्व सोयाबीन बियाणे म्हणून विकले जात नाही. नवीन हंगाम घेताना शेतकरी शक्यतो प्रमाणित आणि विकतचे बियाणे घेणे पसंत करतात. त्यामुळे आता मिळेल तो पैसा शेतकऱ्यांनी दराची आशा सोडून दिली आहे.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करून ठेवत आहे. सोयाबीनला मिळणाऱ्या पाच हजारांच्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे सध्या बाजार ४३०० ते ४५०० रुपये क्विंटल बाजार असले तरी आजही शेतकऱ्याची अवस्था वाईट होईल.

ग्रामीण अर्थकारणावर परिणाम- दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर साडेचार हजारांच्यावर सरकले नाहीत. सोयाबीनला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी सोयाबीन घरीच ठेवले होते. परंतु आता नाइलाजाने कमी भावातच सोयाबीन विकावे लागत आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीन साडेपाच हजारांवर गेले होते. यावर्षीही सोयाबीनचे भाव वाढतील, अशी आशा करून सोयाबीन केले तर त्याचा परिणाम म्हणूनयावर्षीही उत्पादनात मोठी घट झाली आहे.

अधिक वाचा: ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतकरीशेतीपीकखरीपपेरणी