Join us

Onion Market today: राज्यात १ लाख़ १०,१२४ क्विंटल कांद्याची आवक, काय मिळतोय बाजारभाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 22, 2024 4:43 PM

आज लासलगाव- विंचूर बाजारसमितीत ७२०० क्विंटल कांद्याची आवक झाली. क्विंटलमागे...

राज्यात आज दुपारी ४.३० पर्यंत १ लाख १० हजार १२४ क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी लाल, पांढरा, स्थानिक व उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. शेतकऱ्यांना क्विंटलमागे ९५० ते २००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

आज लासलगाव- विंचूर बाजारसमितीत ७२०० क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी १६५० रुपयांचा सर्वसाधारण भाव कांद्याला मिळाला. मालेगाव मुंगसे बाजारसमितीत ८००० क्विंटल उन्हाळी कांद्याला १६०० ते १९०० रुपयांचा भाव मिळाल्याचे पणन विभागाने नोंदवले.

नाशिकमध्ये आज एकूण ७२ हजार ६४६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी १५४० रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळत असून पुणे, कोल्हापूर, सातारा बाजारसमितींमध्ये सर्वसाधारण १४०० रुपयांचा भाव कांद्याला मिळाला.

वाचा कोणत्या बाजारसमितीत किती मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतीआवककमी दरकर्मचारी जास्त दरमूल्य दर
22/05/2024
अहमदनगरउन्हाली९२५१30022001350
चंद्रपूर----४७४1000१७००१५००
छत्रपती संभाजीनगर----१७८२300१६००९५०
धुळेलाल70100१५००1350
जळगावलाल943७९०१६००१२१४
कोल्हापूर----४५८५600२५००1400
मुंबई----९७७०१५००2100१८००
नागपूरस्थानिक11१५००२५००2000
नागपूरलाल२४८३१२५०१८००१७१३
नागपूरपंढरा20001100१६००1425
नाशिकउन्हाली७२६४६४८१1852१५४०
पुणे----७५०१३००2000१५००
पुणेस्थानिक111000१८००1400
सांगलीस्थानिक३७८१60021001350
सातारा----२४४१५००2000१७५०
सातारास्थानिक२५10002100१६००
साताराउन्हाली७५०९००20001400
सोलापूर----३८०300१८००1000
सोलापूरस्थानिक१७१3002000१२००
राज्य एकूण आवक (Qtl.)११०१२७

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्ड