Join us

बाजारातील कांदा आवक २२ टक्क्यांनी घटली, आज असे आहेत कांद्याचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:46 PM

आज २३ मे २४ रोजी लासलगावला कांदा बाजारभाव असे आहेत. जाणून घेऊया.

कांद्याची लासलगाव बाजारातील दिनांक २० मे आधीच्या आठवड्यात सरासरी किंमत रु. १५६८ प्रती क्विंटल अशा होत्या. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत किंमतींत २ टक्केनी वाढ झाली आहे.

दरम्यान देशपातळीवर तसेच राज्यात कांद्याची आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत २२ टक्केनी घट झाली आहे.  शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीला प्राधान्य दिल्याने कांदा आवक घटली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागच्या आठवड्यातील आवक आणि किंमती

दरम्यान आज दिनांक २३ मे रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीची विंचूर उपबाजार समितीत कांद्याची आवक ७२०० क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी सरासरी १६७५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

मनमाड बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

आजचे बाजारभाव असे

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

खेड-चाकण---175130019001500
भुसावळलाल34120017001500
पुणे -पिंपरीलोकल1280018001300
पुणे-मोशीलोकल6785001400950
येवलाउन्हाळी350050019481550

लासलगाव

- विंचूर

उन्हाळी720070020001675
मनमाडउन्हाळी80050017671400

 

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्र