Join us

Rice Market : कोलम की बासमती? कुठल्या तांदळाला बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 7:36 PM

सध्या जय श्रीराम, चिन्नोर, जयप्रकाश, बीपीटी आणि सुवर्णा तांदळाला मागणी आहे.

धामणगाव रेल्वे : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव वाढले असून, वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर भर दिसत आहे. अमरावतीच्या धान्य बाजारात डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार ५५ ते ६० रुपये असलेले चिन्नोरचे दर सध्या ७५ ते ७८ रुपये तर जय श्रीराम तांदूळ प्रति किलो आठ रुपयांनी वाढून ६० ते ६४ रुपयांवर गेला आहे. तांदळाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटल १,८०० रुपयांनी वाढले आहेत. जयप्रकाश तांदूळ ८२ ते ८५ रुपये प्रतिकिलो पोहोचला आहे.

व्यापारी काय म्हणतात..?

व्यापारी रवी कुकरेजा म्हणाले की, जय श्रीराम, चिन्नोर, जयप्रकाश, बीपीटी आणि सुवर्णा तांदळाला मागणी आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात भाव वाढले आहेत. तर  संतोष मुधडा म्हणाले की, हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे भाव आटोक्यात होते. वाढत्या उन्हामुळे भाव वाढले. चिन्नोरमध्ये १,८०० रुपये तर इतर तांदळामध्ये प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपयांची वाढ झाली. जुन्या तांदळाला जास्त मागणी आहे.

असे आहेत तांदळाचे दर 

आज अलिबाग बाजार समितीत कोलम तांदळाला सरासरी 1200 रुपये तर मुरुड बाजार समितीत देखील 1200 रुपयांचा दर मिळाला. तर कालची बाजारभाव ची आकडेवारी पाहिली असता पुणे बाजार समिती बासमती तांदळाला सरासरी 9 हजार 800 रुपये, नागपूर बाजार समिती चिनोर तांदळाला क्विंटल मागे सहा हजार शंभर रुपये, पुणे बाजार समितीत कोलम तांदळाला 5900 रुपये, सांगली बाजार समितीत लोकल तांदळाला 5 हजार 250 रुपये, नागपूर बाजार समिती लुचाई तांदळाला 03 हजार 150 रुपये, पुणे बाजार समितीत मसुरा तांदळाला 03 हजार 300 रुपये तर नागपूर बाजार समिती परमल तांदळाला 3 हजार 725 रुपये दर मिळाला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/05/2024
अलिबागकोलमक्विंटल10100015001200
मुरुडकोलमक्विंटल10100015001200
25/05/2024
भंडारा---क्विंटल3400043004200
पुणेबसमतीक्विंटल347000126009800
नागपूरचिनोरक्विंटल50580062006100
पुणेकोलमक्विंटल652480070005900
अलिबागकोलमक्विंटल10100015001200
मुरुडकोलमक्विंटल10100015001200
सांगलीलोकलक्विंटल254400065005250
उमरेडलोकलक्विंटल116380055004750
नागपूरलुचाईक्विंटल25300032003150
पुणेमसुराक्विंटल404320034003300
मानगाव (भादव)नं. २क्विंटल55190048003800
कर्जत (रायगड)नं. २क्विंटल577400058004800
नागपूरपरमलक्विंटल40350038003725
टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेती क्षेत्रअमरावती