Join us

Soybean Market : लातूर बाजारात सोयाबीनचा दर स्थिरच; आवक किती वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:08 IST

Soybean Market : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Latur APMC) गुरुवारी सोयाबीनचा दर मागील दोन दिवसांप्रमाणेच ५ हजार ३७० रुपये प्रतिक्विंटल स्थिर राहिला. आवकही (Arrivals) ४ हजार ३२५ क्विंटलवर नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी आणि पावसाचा ओढा यामुळे दरात अपेक्षित तेजी न दिसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. (Soybean Market)

Soybean Market : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत(Latur APMC) गुरुवारी सोयाबीनचा दर मागील दोन दिवसांप्रमाणेच ५ हजार ३७० रुपये प्रतिक्विंटल स्थिर राहिला. आवकही(Arrivals) ४ हजार ३२५ क्विंटलवर नोंदली गेली. (Soybean Market)

आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी आणि पावसाचा ओढा यामुळे दरात अपेक्षित तेजी न दिसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. पिकांना पावसाचा जीवदान मिळाल्यानंतरही बाजारातील हालचाल अजूनही मंदच आहे.(Soybean Market)

कृषी उत्पन्न बाजार समित्यांत (एपीएमसी) सोयाबीनच्या बाजारभावात स्थैर्य दिसून येत आहे. लातूर एपीएमसीत गुरुवारी ४ हजार ३२५ क्विंटल सोयाबीनची आवक (Arrivals)झाली असून, सरासरी दर प्रतिक्विंटल ५ हजार ३७० रुपये इतकाच नोंदविण्यात आला. मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत असले तरी गेल्या दोन दिवसांपासून दर स्थिर आहे.(Soybean Market)

गेल्या हंगामात राज्यात सोयाबीन उत्पादन समाधानकारक झाले. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलबियांच्या किमतीत घट झाल्यामुळे भावात अपेक्षित तेजी आलेली नाही. यंदा राज्यात चार लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हंगामातील पुढील काळात भाव काहीसे सुधारतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पाऊस न झाल्याने चिंतेत शेतकरी

पेरण्या झाल्यानंतरही अनेक भागांत पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे पिके निस्तेज होऊ लागली असून, त्याला पाणीपुरवठा होईल एवढा पाऊस लवकर पडावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. काही भागांत जोरदार पावसामुळे नाल्यांना पूर आला असला तरी बऱ्याच भागात अजूनही पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

लातूर बाजार समितीचा दर आणि आकडेवारी

लातूर बाजार समितीच्या अहवालानुसार गुरुवारी ४ हजार ३२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. दर स्थिर असून जास्तीत जास्त दर ५ हजार ४०० रुपये तर किमान दर ५ हजार २०० रुपये इतका होता. सरासरी दर ५ हजार ३७० रुपये प्रती क्विंटल नोंदला गेला.

कुरुडुसीत सर्वाधिक दर नोंदले गेले. लातूरच्या बाजारात आलेल्या सोयाबीनची गुणवत्ता समाधानकारक असून, त्याला स्थिर दर मिळाला. मात्र, इतर ठिकाणी मालाची गुणवत्ता कमी असल्यामुळे दरात थोडी घट दिसून आली.

शेतमालाची गुरुवारची आवक

गुरुवारी लातूर बाजार समितीत एकूण ८ हजार ३१७ क्विंटल शेतमालाची आवक झाली.

ज्वारी : ३८२ क्विंटल

तूर : ५७ क्विंटल

मका : ५० क्विंटल

हरभरा : ९०० क्विंटल

उडीद : ४२ क्विंटल

बार्ली : ७५ क्विंटल

सोयाबीनची सर्वाधिक ४ हजार ३२५ क्विंटलची नोंद झाली.

उडीद-मुगाच्या आवक घटल्याचे कारण काय?

अतिवृष्टीमुळे उडीद-मुगाचे पीक काही ठिकाणी खराब झाले असून, परिणामी या शेतमालाची बाजारात आवक घटली आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्यास आणि पिकांना चांगली वाढ झाल्यास आवक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

सध्या सोयाबीनच्या दरात स्थिरता असून, सरासरी भाव ५ हजार ३७० रुपये इतकाच आहे. मात्र, पावसाची अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यामुळे पुढील काळात दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य व्यवस्थापन करीत बाजारभावावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीलातूर