Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनला पुन्हा तेजी; दरांनी ओलांडला 'इतक्या' हजारांचा टप्पा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:41 IST

Soybean Bajar Bhav : हंगामाच्या अखेरीस सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जाणून घ्या कसा मिळला दर 

Soybean Bajar Bhav : गेल्या काही दिवसांपासून दबावात असलेल्या सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे.(Soybean Bajar Bhav)

सोमवारी वाशिम जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ५,५०० रुपयांचा टप्पा पार करत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Soybean Bajar Bhav)

नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. त्या काळात मिल क्वालिटी सोयाबीनचे दर ६ हजार रुपयांच्या आसपास पोहोचले होते.(Soybean Bajar Bhav)

मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरानंतर बाजारात आवक वाढल्याने आणि मागणी कमी झाल्यामुळे दरांमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.(Soybean Bajar Bhav)

मागणी वाढल्याने दरात सुधारणा

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयापेंडच्या मागणीत पुन्हा वाढ होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारातही सोयाबीनचा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

परिणामी सोयापेंडची उपलब्धता कमी राहण्याचा अंदाज असून निर्यात सुमारे आठ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यापैकी सुमारे पाच लाख टन सोयापेंडची निर्यात डिसेंबरपर्यंत झाली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यातील बाजारातील दर

सोमवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमाल आणि सरासरी मिळालेले दर पुढीलप्रमाणे आहेत (प्रति क्विंटल)

वाशिम : ५,५७५ रुपये

कारंजा : ५,५६० रुपये

मानोरा : ५,४८० रुपये

रिसोड : ४,५०० रुपये

या दरांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात समाधान मिळत असल्याचे दिसून येत आहे.

बाजारात आवक घटली

सोयाबीनच्या दरात तेजी दिसू लागल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला माल बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही काळ बाजार समित्यांमध्ये आवक वाढली होती. मात्र, आता बहुतेक शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा साठा कमी उरल्याने पूर्वीच्या तुलनेत बाजारातील आवक घटल्याचे दिसून येत आहे. याचाही दरवाढीस हातभार लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

बिजवाई सोयाबीनचे दरही वाढले

मिल क्वालिटी सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना बिजवाई (Seed Quality) सोयाबीनचे दर काही काळ स्थिर होते. मात्र, आता या सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून येत असून वाशिम बाजार समितीत बिजवाई सोयाबीनचे दर ६ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

बियाणे कंपन्यांची खरेदी सुरू

नवीन खरीप हंगामाची तयारी लक्षात घेऊन विविध बियाणे कंपन्यांनी सोयाबीन खरेदीला सुरुवात केली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली जात आहे. त्यामुळेही बाजारातील मागणी वाढून दरांना आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मागणी वाढणे, बाजारातील आवक कमी होणे आणि बियाणे कंपन्यांची खरेदी सुरू होणे या कारणांमुळे सध्या सोयाबीनच्या दरात तेजी कायम आहे. 

बाजार अभ्यासकांच्या मते, पुढील काही दिवस सोयाबीनच्या दरातील ही तेजी टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Gahu Bajarbhav : आवक कमी तरी गव्हाचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

अधिक वाचा : Harbhara Bajarbhav : हरभऱ्याला कुठे मिळाला ७ हजारांचा दर? आजचे बाजारभाव पाहा

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Surge Again: Breaching ₹5,500 Mark in Washim Markets

Web Summary : Soybean prices are rising again, crossing ₹5,500/quintal in Washim. Increased soymeal demand and reduced supply are driving the price hike, benefiting farmers. Seed companies' purchases also support the surge.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीन