सोयगाव : पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर जागतिक पातळीवर वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे.
सुट्या सोयाबीन तेलाच्या दरात ११ टक्के तर पॅकेजिंग तेलाच्या दरात साडेदहा ते १२ टक्क्यांची वाढ झाली. यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला युद्धाची झळ बसू लागली आहे.
सोयाबीन खाद्यतेलाचे दर गेल्या १५ दिवसांत साधारण ८ टक्के ते १२ टक्केपर्यंत वाढले. किरकोळ बाजारात १५२ ते १५५ लिटर असलेले सोयाबीन तेलाचे दर १६५ ते १६८ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत. सूर्यफुल तेलाच्या दरात ८ ते १० टक्केपर्यंत तर शेंगदाणा तेलाच्या दरात १० ते १३ टक्के वाढ झाली आहे.
शेंगदाणा व सूर्यफुल खाद्यतेलाच्या तुलनेत सर्वाधिक निम्म्यापेक्षा अधिक खरेदी सोयाबीन तेलाची होते. सर्वसामान्य कुटुंब, हॉटेल, रेस्टॉरंट व खाद्यपदार्थाच्या गाड्यांसाठी सर्रास सोयाबीन तेल वापरले जाते.
१५ दिवसांत असे वाढले दर (सोयाबीन)
- १ लिटर - आधीचे दर १५२, पूर्वीचे दर १६८
- १० लिटर - आधीचे दर १४३५, पूर्वीचे दर १५९०
- पॅकिंग कॅन ५ लिटर - आधीचे दर ७५०, पूर्वीचे दर ८४०
- पॅकिंग कॅन १५ लिटर - आधीचे दर २१९०, पूर्वीचे दर २४२०
- पॅकिंग कॅन १५ किलो - आधीचे दर २३९५, पूर्वीचे दर २६५०
खाद्यतेलाच्या दरवाढीची ही आहेत कारणेभारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतो. सोयाबीन, सूर्यफुल तसेच शेंगदाणा तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यात पामतेल मिसळले जाते. भारताला पामतेल इंडोनेशिया व मलेशिया येथून आयात होते. जागतिक तणाव व जहाज वाहतुकीचा खर्च चाढल्यामुळे आयात खर्च वाढला व तेल महाग झाले.
सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या मालेगाव महापालिका क्षेत्राला दररोज सुमारे ४४ हजार किलो अर्थात ४४ टन इतके खाद्यतेल लागते. दैनंदिन ७० लाख रुपये इतका खाद्यतेलाचा बाजार आहे. वार्षिक सुमारे अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल होते.- विजय देव, खाद्यतेल व्यापारी
Web Summary : Soybean oil prices jumped 8-12% in 15 days due to international conflict affecting supply. Retail prices rose to ₹168/liter. Increased import costs of palm oil from Indonesia and Malaysia also contributed to the hike.
Web Summary : अंतर्राष्ट्रीय संघर्ष के कारण आपूर्ति प्रभावित होने से 15 दिनों में सोयाबीन तेल की कीमतें 8-12% बढ़ीं। खुदरा कीमतें बढ़कर ₹168/लीटर हो गईं। इंडोनेशिया और मलेशिया से पाम तेल के आयात में वृद्धि ने भी वृद्धि में योगदान दिया।