Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cotton Market : कापूस निर्यातदार भारत हाेताेय माेठा आयातदार, सरकारी धाेरणांमुळे उलटा प्रवास सुरू 

By सुनील चरपे | Updated: February 10, 2026 13:43 IST

Cotton Market : अमेरिकेसोबतचे ट्रेड डील कापूस उत्पादकांना आर्थिक संकटात टाकणार असल्याचे चित्र आहे.

- सुनील चरपेनागपूर : बीटी बियाण्यांमुळे सन २००४-०५ पासून भारतातील कापसाचे उत्पादन वाढायला सुरुवात झाली आणि सन २००५-०६ पर्यंत कापसाचा आयातदार असलेला भारत सन २००७-०८ पासून निर्यातदार झाला. 

सन २०२३-२४ मध्ये भारताने सर्वाधिक म्हणजे ११८.८१ लाख गाठी कापूस निर्यात केला. सन २०२२-२३ पासून कापसाची निर्यात कमी व आयात वाढत आहे. सरकारी धाेरणांमुळे कापसाला खर्च भरून निघेल एवढाही दर मिळत नसल्याने पेरणी क्षेत्र व उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.

सुरुवातीला देशात कापसाचे पेरणी क्षेत्र सरासरी ४४ ते ६५ लाख हेक्टर हाेते, ते सन १९९० च्या दशकात ८५ लाख, २००० च्या दशकात १०० लाख तर सन २०१० नंतर १२५ ते १३४.७७ लाख हेक्टरपर्यंत कापसाचे पेरणी क्षेत्र वाढत गेले. हेक्टरवर कापसाची पेरणी केली जायची. सन १९७० पर्यंत कापसाचे सरळवाण तर त्यानंतर हायब्रीड तसेच २००२ पासून हायब्रीड बीटी वाण वापरायला सुरुवात झाली. 

पेरणी क्षेत्रासाेबत देशातील कापसाचे उत्पादनही वाढत गेले. सन १९४७ ते १९७० पर्यंत देशातील कापसाचे उत्पादन ४४.२४ ते ५६.६४ लाख गाठींपर्यंत हाेते. १९८० व १९९० या तीन दशकात ते ७८ ते ११७ लाख गाठी आणि बीटी वाण आल्यानंतर १४० लाखांवरून ३९० लाख गाठींपर्यंत पाेहाेचले. पेरणी क्षेत्र वाढायला दर आणि उत्पादन वाढायला बीटी वाण कारणीभूत ठरले.

२००४-०५ पर्यंत भारताची कापूस आयात ही निर्यातीपेक्षा अधिक हाेती. या काळात सरासरी १२ ते २२ लाख गाठी कापसाची आयात तर ०.६० ते ९.१४ लाख गाठींची निर्यात केली जायची. २००७-०८ नंतर कापसाच्या निर्यातीत आमूलाग्र वाढ हाेऊन आयात ही ६.३८ ते २०.४० लाख गाठींच्या दरम्यान राहिली. २०२४-२५ पासून कापसाची आयात ४१ ते ५० लाख गाठींवर पाेहाेचली असून, निर्यात मात्र १८ लाख गाठींपर्यंत खाली आली आहे.

कापसाचा लेखाजाेखा

  • वर्ष - उत्पादन - आयात - निर्यात (लाख गाठी)
  • १) १९४७ ते १९६० - ३३.३६ ते ६०.१२ -  -- -  --
  • २) १९६० ते १९८० - ५६.६४ ते ७८.०० -  -- -  --
  • ३) १९८० ते २००० - ८०.०० ते १४०.०० -  -- -  --
  • ४) २००० ते २०१० - १४०.०० ते ३०५.०० - २.३८ ते २२.१३ - ०.६० ते ८८.५०
  • ५) २०१० ते २०२० - ३३९.०० ते ३६५.०० - २.३८ ते ३०.९४ - ७६.५० ते ११८.८१
  • ६) २०२० ते २०२५ - ३५२.४८ ते ३३३.२५ - ११.०३ ते २०.४० - १५.८९ ते ७७.५९

सर्वाधिक आयात व निर्यातकापसाची सर्वाधिक ५० लाख गाठी कापसाची आयात २०२५-२६ मध्ये करण्यात आली असून, त्यात सप्टेंबरपर्यंत आणखी वाढ हाेणार आहे. २०१३-१४ मध्ये सर्वाधिक ११८.८१ लाख गाठींची निर्यात करण्यात आली असून, यातील ६५ टक्के कापूस चीनने खरेदी केला हाेता. अमेरिकेसाेबतचे ट्रेड डील, शुल्कमुक्त आयात, वाढता खर्च, मिळणारा कमी दर व बियाण्यांच्या खालावलेल्या गुणवत्तेचा कापसाची आयात-निर्यात व उत्पादनावर परिणाम हाेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India: From Cotton Exporter to Importer Due to Government Policies

Web Summary : India, once a major cotton exporter due to BT seeds, is now importing more. Government policies impacting prices and seed quality have reduced planting areas and overall production, reversing the export trend.
टॅग्स :कापूसशेती क्षेत्रशेतीबाजारटॅरिफ युद्ध