Join us

Soybean Market : केवळ 'याच' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, आज कुठे काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 4:45 PM

आज राज्यात पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक 15 हजार क्विंटलची आवक लातूर बाजार समितीत झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 29 हजार क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक 15 हजार क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक लातूर बाजार समितीत झाली. आज सोयाबीनला सरासरी 4100 रुपये ते 4699 रुपये दर मिळाला. सोयाबीनला हमीभावा पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी णर्ज असल्याचे चित्र आहे. 

आजच्या 08 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात सर्वसाधारण, हायब्रीड, लोकल आणि पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. मात्र सर्वाधिक आवक ही पिवळ्या सोयाबीनचीच झाली. आज सर्वसाधारण सोयाबीनला सरासरी 4300 रुपये ते 4550 रुपये दर मिळाला. धुळे बाजार समितीत हायब्रीड  सोयाबीनला सरासरी 4200 रुपये दर मिळाला. 

लोकल सोयाबीनला सोलापूर बाजारात 4650 रुपये, अमरावती बाजारात 4410 रुपये, नागपूर बाजारात 4410 रुपये, अमळनेर बाजारात 4100 रुपये दर मिळाला. पिवळ्या सोयाबीनला लातूर बाजारात सरासरी 4670 रुपये, अकोला बाजारात 4435 रुपये, यवतमाळ बाजारात 4300 रुपये, पैठण बाजारात 4271 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सोयाबीनचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/05/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल2430043004300
कारंजा---क्विंटल3000425045954475
तुळजापूर---क्विंटल60455045504550
मालेगाव (वाशिम)---क्विंटल300420044754300
धुळेहायब्रीडक्विंटल6420042004200
सोलापूरलोकलक्विंटल32464046704650
अमरावतीलोकलक्विंटल4065435044704410
नागपूरलोकलक्विंटल610410045214410
अमळनेरलोकलक्विंटल5410041004100
मेहकरलोकलक्विंटल1505400045854300
लातूरपिवळाक्विंटल14353456147484670
अकोलापिवळाक्विंटल4311415545304435
यवतमाळपिवळाक्विंटल341400046004300
पैठणपिवळाक्विंटल3427142714271
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल66426045004380
परतूरपिवळाक्विंटल8420046004550
नांदगावपिवळाक्विंटल4445045304500
औसापिवळाक्विंटल657454147314699
पुर्णापिवळाक्विंटल388442145614540
राजूरापिवळाक्विंटल91390044904465
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल127380044004250
सिंदीपिवळाक्विंटल36384043004200
टॅग्स :शेतीसोयाबीनमार्केट यार्डलातूर