Join us

Soyabean Market : अमरावती, अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, हमीभाव मिळाला का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 3:58 PM

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 16 हजार 324 क्विंटलची आवक झाली. अपेक्षित बाजारभाव तसेच केंद्राने जाहीर केलेला हमीभावच मिळत ...

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 16 हजार 324 क्विंटलची आवक झाली. अपेक्षित बाजारभाव तसेच केंद्राने जाहीर केलेला हमीभावच मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आजच्या बाजारभाव अहवालानुसार सोयाबीनला सरासरी 4050 रुपये ते 4585 रुपये दर मिळाला. आजच्या दिवसातील सर्वात कमी आणि सर्वाधिक दर हा पिवळ्या सोयाबीनला मिळाला. 

आजच्या 07 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक सहा ते सात हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज सर्वसाधारण सोयाबीनला 4295 रुपये ते 4525 रुपये दर मिळाला. तर लोकल सोयाबीनला अमरावती बाजारात 4511 रुपये, नागपूर बाजारात 4400 रुपये, हिंगोली बाजारात 4347 रुपये दर मिळाला. 

तर पिवळ्या सोयाबीनला सरासरी वरोरा-खांबाडा बाजार समितीत 4050 रुपये तर परतूर बाजार समितीत 4585 रुपये दर मिळाला. हाच आजच्या दिवसातील अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वाधिक दर मिळाला. अकोला बाजारात 4400 रुपये,  यवतमाळ बाजारात 4445 रुपये, चिखली बाजारात 4375 रुपये दर मिळाला. दरम्यान आज सायंकाळी चार वाजेपर्यंत एकाही बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही. 

असे आहेत आजचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/05/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल8420043904295
कारंजा---क्विंटल3000420046004525
अमरावतीलोकलक्विंटल4386445045724511
नागपूरलोकलक्विंटल1166410045004400
हिंगोलीलोकलक्विंटल1050414045554347
अकोलापिवळाक्विंटल3705425544704400
यवतमाळपिवळाक्विंटल629434045504445
चिखलीपिवळाक्विंटल621420045504375
उमरेडपिवळाक्विंटल1007400045604350
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल7440045004450
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल72425044504350
जिंतूरपिवळा
टॅग्स :शेतीसोयाबीनमार्केट यार्डअकोलाहिंगोली