Join us

कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीचा ठसका, क्विंटलमागे सर्वाधिक मिळाला भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 25, 2024 4:18 PM

आज राज्यात लाेकल मिरचीची आवक झाली असून अशी होती आवक

राज्यात लाल मिरचीचा ठसका कमी झाल्याचे पहायला मिळत असताना कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीला बुधवारी क्विंटलमागे ४६ हजारांचा भाव मिळाला.

बुधवारी कोल्हापूरात २१ क्विंटल शंखेश्वरी मिरचीची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण ४६ हजार १०० रुपये तर जास्तीत जास्त मिळणारा भाव ८० हजार १०० रुपयांचा भाव मिळाला.

काल राज्यात ३१४३ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली. कोल्हापूर सोडता इतर बाजारसमितीत लोकल जातीच्या लाल मिरचीची आवक झाली. यावेळी १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

दरम्यान, आज राज्यात ४९७५ क्विंटल लोकल लाल मिरचीची आवक झाली. मुंबई, नागपूर, सांगलीमध्ये लाल मिरचीला क्विंटलमागे १४ ते १८ हजारांचा भाव मिळाला असून मुंबईत लाल मिरचीला क्विंटल ४२ हजार रुपयांचा भाव मिळाला.

टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डकोल्हापूर