Join us

जाणून घ्या : राज्यातील कापसाचे बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 4:58 PM

राज्यातील कापूस बाजारदराची काय आहे स्थिती ! जाणून घेऊया.

राज्यातील अनेक शेतकर्‍यांकडे आजही कापूसबाजारभाव सुधारेल या आशेने साठवलेला कापूस आहे. गेल्या वर्षी दहा हजारांचा टप्पा गाठलेला कापूस या वर्षी मात्र सहा ते सात हजार रुपये दरम्यान बाजारभावात दिसून आल्याने शेतकर्‍यांत नाराजी व्यक्त होत होती. मात्र आता काही अंशी बाजारदर उंचावले असून यामुळे शेतकर्‍यांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

फेब्रुवारीच्या महिना अखेर आज राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये कापसाची मध्यम आवक झाली आहे. ज्यास सरासरी सात ते सात हजार पाचशे असा दर मिळाला. सर्वाधिक दर हा सात हजार आठशे पन्नास रुपये मनवत येथील बाजारसमितीमध्ये मिळाला आहे. आज कापसाची सर्वाधिक आवक राळेगाव बाजारसमिति मध्ये झाली असून लोकल कापसाच्या वाणाची नोंद झाली आहे.

राज्यातील विविध बाजार बाजारसमितींमध्ये आज झालेली कापसाची आवक व बाजारभाव  पुढीलप्रमाणे

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/02/2024
अमरावती---क्विंटल90730074007350
राळेगाव---क्विंटल5500665076307500
अकोलालोकलक्विंटल46738078507615
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल107710078007450
उमरेडलोकलक्विंटल420680073207100
मनवतलोकलक्विंटल2800670078557775
देउळगाव राजालोकलक्विंटल750700077607450
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1510667575507150
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2290670076107510

 

टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डकॉटन मार्केट