Join us

Kesar Mango: लातूरच्या केशर आंब्याचा गुजरात, मध्यप्रदेश राज्यातही गोडवा! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:05 IST

Kesar Mango : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा लातूरच्या बाजारात चांगलाच भाव खात आहे. अक्षयतृतीयेपासून आंब्याची आवक वाढली आहे. इथला केशर आंब्याने राज्यातच नव्हे, परराज्यातही गोडवा वाढविला आहे. वाचा सविस्तर (Kesar Mango)

आशपाक पठाण

फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबालातूरच्या बाजारात चांगलाच भाव खात आहे. अक्षयतृतीयेपासून आंब्याची आवक वाढली आहे. इथला केशर आंब्याने राज्यातच नव्हे, परराज्यातही गोडवा वाढविला आहे.  (Kesar Mango)

या केशर आंब्याला गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आदी भागांतून मागणी आहे. येथील फळबाजारात दररोज जवळपास १५० टन आंबा विक्रीसाठी येत आहे.

उन्हाळा आला की द्राक्ष, टरबूज रसाळ फळांना मागणी असते. आता या फळांचा हंगाम सरत आला असून, आंब्याची आवक सुरू झाली आहे. अक्षयतृतीयेपासून आमरसाचा घरोघरी बेत सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक जण चांगला दर मिळत असल्याने बाजारात आंबे विक्रीसाठी आणतात. (Kesar Mango)

सध्या गावरान आंबा मिळणे कठीण झाले असून, केशर आंब्याने बाजारपेठेत गोडवा वाढविला आहे.

लातूरची बाजारपेठ केशर आंब्यासाठी देशभरात नावारूपाला येत आहे. येथील बाजारातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब आदी ठिकाणांहून व्यापारी आंबा खरेदीसाठी येतात. इथून खरेदी करण्यात आलेला आंबा थेट परराज्यात जात आहे. (Kesar Mango)

केशर आंब्याचे माहेरघर

लातूर हे जणू केशर आंब्याचे माहेरघर बनले असल्याचे चित्र सध्या येथील फळबाजारात पाहावयास मिळत आहे. येथील बाजारपेठेला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा भाग जवळ पडत असल्याने, त्या भागातील अनेक बागायतदार लातूरला आंबा विक्रीसाठी आणतात.

बसवकल्याण, हुमनाबाद, जहिराबाद भागातून आवक

सध्या येथील फळबाजारात बसवकल्याण, हुमनाबाद, जहिराबादसह लातूर जिल्ह्यातून आवक आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज दीडशे टन आवक होत आहे. या आंब्याला परराज्यात मागणी वाढली आहे.

काय आहेत आंब्याचे दर

फळबाजारात दररोज १५० ते १६० टन केशर आंब्याची आवक सुरू आहे. केशरला प्रतिटन ६० हजार ते १ लाख १० हजार रुपयांप्रमाणे विक्री सुरू आहे. किरकोळ विक्री मात्र दीडशे ते दोनशे रुपये किलोप्रमाणे होत आहे. - बरकत बागवान, ठोक विक्रेते.

कॅरेटला दोन हजार

फळबाजारात २० किलो केशर आंब्याचे (कच्चा) कॅरेट दीड ते दोन हजार रुपयांना विक्री होत आहे. चवीला गोड असलेल्या केशरने यंदाही आपला रुबाब कायम ठेवला आहे. आंब्याच्या साइजनुसार दर मिळत आहे. सध्या दर स्थिर आहेत. आवक वाढली असून, मागणीही तुलनेने जास्त झाली आहे. - उमर बागवान, ठोक विक्रेते.

हे ही वाचा सविस्तर : Hapus Mango: आवक वाढल्याने देवगडचा हापूस आंबा तोऱ्यात! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रआंबाआंबालातूरकर्नाटकमध्य प्रदेश