Join us

Kanda Bajar Bhav : चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली; दरात झाली का सुधारणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:26 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. तर बटाट्याची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. तर बटाट्याची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले.

टोमॅटो, गवार, वांगी, कोबी, फ्लॉवरची आवक कमी झाली. पालेभाज्यांची भरपूर आवक आणि भाव गडगडले. जनावरांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ४० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,७५० क्विंटलने कमी होऊनही कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावले.

बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढूनही बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला.

लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ४२५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

शेतीमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक ४,२५० क्विंटल.भाव क्रमांक १) १,४०० रुपये..भाव क्रमांक २) १,१०० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.बटाटाएकूण आवक २००० क्विंटल.भाव क्रमांक १)२,००० रुपये.भाव क्रमांक २) १,७०० रुपये.भाव क्रमांक ३) १,५०० रुपये.

अधिक वाचा: Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर