चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये टोमॅटो, रताळे, गाजर व हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत.
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही भाज्यांचे भाव तजेतील राहिले. चाकणला भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल ३ कोटी ७० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक निम्म्याने घटूनही भावात दोनशे रुपयांची घट झाली आहे.
कांद्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून १,८०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ७०० क्विंटलने घटूनही कमाल भाव २,२०० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भावही १० हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ४०५ क्विंटल झाली.
शेतीमाल आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - ५०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,८०० रुपये.भाव क्रमांक २) १,५०० रुपये.भाव क्रमांक ३) १,२०० रुपये.बटाटाएकूण आवक - १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १) २,२०० रुपये.भाव क्रमांक २) १,७०० रुपये.भाव क्रमांक ३) १,५०० रुपये.
मिरचीला ५ हजाराचा भावहिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भावही १० हजार रुपयांवर स्थिरावला.
अधिक वाचा: पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर