Join us

या बाजारसमितीत काबुली चण्याला मिळतोय सर्वाधिक भाव, कुठे किती होती आवक जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 4:39 PM

आज रविवारी दि १९ मे रोजी इथे काबुली चण्याला सर्वाधिक दर

राज्यात आज हरभऱ्याची आवक काहीशी मंदावली असून दुपारी ४.३० वाजेपर्यंत २९८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी लोकल जातीच्या हरभऱ्यासह लाल, काबुली, हायब्रीड हरभराबाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला होता.

आज राज्यात बुलढाण्यात काबुली चण्याला ९००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हरभऱ्याला ६००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. बुलढाण्यात आज काबुली चण्यासह हायब्रीड व लाल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी सर्वाधिक भाव काबूली चण्याला मिळाला. उर्वरित बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला ४३०० ते ९००० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

कोणत्या बाजारसमितीत हरभऱ्याला काय भाव मिळतोय? जाणून घ्या..

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/05/2024
अहमदनगरलाल5430043004300
बुलढाणाहायब्रीड80550060005800
बुलढाणालाल80550060005800
बुलढाणाकाबुली130850095009000
छत्रपती संभाजीनगर---2600060006000
पुणेलाल1580058005800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)298

टॅग्स :हरभरामार्केट यार्डबाजार