Join us
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला आज सर्वाधिक दर, उर्वरित बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात...

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 2, 2024 14:39 IST

सध्या विदर्भातून सर्वाधिक आवक, मराठवाड्यात कापूस आवक मंदावली.

राज्यात आज सकाळच्या सत्रात १६८ क्विंटल कापसाची आवक झाली. त्यात बुलढाण्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर मिळत असून सर्वसाधारण 7855 ते 8880 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. बुलढाण्यात आज 500 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली.

आज सकाळच्या सत्रात चार बाजार समित्यांमध्ये कापूस विक्रीसाठी दाखल झाला असून साधारण 7300 ते 7800 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. राज्यभरात सर्वाधिक कापूस सध्या विदर्भातून येत असून मराठवाड्यातून कापसाची आवक आता चांगलीच घटली आहे. सध्या अकोला चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर या जिल्ह्यांमधून कापसाची आवक  होत आहे.

यवतमाळ वगळता उर्वरित बाजार समितीमध्ये आज लोकल कापसाची आवक झाली. यवतमाळ मध्ये एच चार मध्यम स्टेपल जातीचा 221 क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. त्याला क्विंटल मागे 7350 रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. नागपूरमध्ये आज २७७ क्विंटल कापसाची आवक झाली. यावेळी ७३५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला.

 

टॅग्स :कापूसबुलडाणाबाजारमार्केट यार्ड