Join us

Garlic Prices: लसणाचा बाजारभाव उतरताेय, किलोमागे मिळतोय एवढा दर

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 27, 2024 5:06 PM

किलोमागे २०० रुपये मिळणारा लसूण आता किती रुपयांवर आलाय?

राज्यात लसणाचा किलोमागे २०० रुपयांचा भाव आता काहीसा उतरू लागला आहे. राज्यात आज दिवसभरात १ हजार ८९५ क्विंटल लसणाची आवक झाली. यावेळी लोकल व हायब्रीड लसूण बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. शेतकऱ्यांना क्विंटलमागे आता ८००० ते १६००० रुपयांचा सर्वासाधारण भाव मिळाला. किरकोळ बाजारात लसणाला किलोमागे साधारण १२० ते १६० रुपये भाव मिळत आहे.

पुण्यात किलोमागे द्यावे लागताहेत..

पुण्यात आज १०७६ क्विंटल लसणाची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना १२ हजार ७५० रुपयांचा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात नागरिकांना किलोमागे १२० ते १३० रुपयांचा भाव मिळत आहे.

क्विंटलमागे भाव कुठवर पोहोचला?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ क्विंटल लसणाला १२००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. तर अमरावती, ठाणे, अकोला या बाजारसमित्यांमध्ये क्विंटलमागे मिळणारा भाव १५ हजार ते २० हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे.

कमीत कमी भाव घसरला

ठाण्यात हायब्रीड लसणाला कमीत कमी १० हजार रुपये मिळत असून सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर बाजारसमितींमध्ये लसणाला ८ ते १० हजार रुपयांचा कमीत कमी भाव मिळत आहे.

पहा कुठे कशी आवक झाली?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/05/2024
अहमदनगर---23600090008000
अकोला---347120001600015000
अमरावतीलोकल270100002000015000
छत्रपती संभाजीनगर---4580001500012000
नागपूरलोकल1160001600016000
पुणेलोकल107690001650012750
सांगलीलोकल12090002000014500
सोलापूर---1080001200010000
ठाणेहायब्रीड3100002000015000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1895

टॅग्स :बाजारपुणेशेतकरी