सोलापूर : सध्या फळ बाजारात थेट केरळवरून आलेली 'इलायची' केळी. दिसायला आपल्या करंगळीएवढी, नाजूक आणि इवलीशी; पण भाव ऐकला तर डोळे विस्फारतील.
कारण, सफरचंदाच्या तोडीस तोड भाव खाणाऱ्या या केळीसाठी चक्क १२० रुपये किलो मोजत आहेत. सध्या बाजारात विरोधाभासाचे चित्र आहे.
एकीकडे नेहमीच्या साध्या (मोठ्या) केळीचे दर अक्षरशः गडगडले आहेत. अवघ्या २० ते ३० रुपये डझनाने ही केळी विकली जात आहे.
म्हणजेच, १२० रुपयांत तुम्हाला तब्बल ५ ते ६ डझन साधी केळी मिळू शकतात. मात्र, दुसरीकडे केरळच्या या इलायची केळीचा भाव १०० ते १२० रुपये किलोवर स्थिर आहे.
एका किलोमध्ये साधारणपणे दोन ते तीन डझन छोटी केळी बसतात. तुलना करायची झाली तर, एका साध्या केळीच्या किमतीत ही दोन छोटी केळी येतील, इतका हा फरक आहे.
मात्र, सफरचंदाचे दर वाढल्याने आणि या केळीची चव अत्यंत गोड व सुगंधी असल्याने खवय्ये पैशांकडे न बघता या 'इलायची'चीच खरेदी करत आहेत.
विशेषतः लहान मुलांना ही छोटी केळी आकाराने भारी वाटत असल्याने पालकांची पावले आपोआप या गाड्यांकडे वळत आहेत.
अधिक वाचा: पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफीचा फायदा; प्रत्येक कर्ज प्रकरणामागे शेतकऱ्यांची किती रुपयांची बचत
Web Summary : Despite a banana market crash, tiny 'Elaychi' bananas from Kerala sell for ₹120/kg. Regular bananas are ₹20-30/dozen. Their sweet taste, fragrance, and appeal to kids drive high demand, rivaling apples.
Web Summary : केले के बाज़ार में गिरावट के बावजूद, केरल से आए छोटे 'इलायची' केले ₹120/kg में बिक रहे हैं। सामान्य केले ₹20-30/दर्जन हैं। इनका मीठा स्वाद, खुशबू और बच्चों को पसंद आना इनकी उच्च मांग का कारण है, जो सेबों को भी टक्कर दे रहे हैं।