Join us

कापसाची आवक वाढतेय, वरलक्ष्मी, एचकेएच मध्यम स्टेपलला मिळतोय असा बाजारभाव

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 11, 2024 15:46 IST

विदर्भातून सर्वाधिक कापूस येत असून आज दुपारपर्यंत ११३७२ क्विंटल कापसाची आवक झाली.

राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज दुपारपर्यंत ११३७२ क्विंटल कापसाची आवक झाली. विदर्भातून सर्वाधिक कापूस येत असून आज वरलक्ष्मी-मध्यम स्टेपल, एकेएच, एच-४ या जातींसह नं १ व लोकल कापसाची आवक होत आहे. 

वर्ध्यात आज ५२१० क्विंटल कापसाची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ७१७३ रुपयांचा भाव मिळत आहे. त्याखालोखाल नागपूरमधूनही कापसाची आवक वाढली असून आज २१०० क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता.

बुलढाण्यात आज ६०० क्विंटल कापसाची आवक झाली.  शेतकऱ्यांना यावेळी सर्वसाधारण ७७५० रुपये भाव मिळत आहे.

कुठे काय मिळाताहेत कापसाला भाव?

टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्ड