Join us

नाशिककरांनो पारा वाढलाय, भरपूर शहाळ्याचं पाणी प्या, पण शहाळं किती रुपयाला?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 25, 2024 4:34 PM

मागील आठवड्यापासून या दोन बाजारसमितींमध्येच शहाळ्याची आवक, काय मिळतोय भाव?

राज्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार कधीच पोहाेचला आहे. आज नाशिक जिल्ह्यात ४१ अंशांची नोंंद हाेत असल्याचे हवामान विभागाने सांगितले. उष्णतेचा चटका वाढला असून उन्हात बाहेर जाताना शरिरातील पाणीपातळी योग्य ठेवण्यासाठी नाशिककर भरपूर शहाळ्याचं पाणी पिण्यास पसंती देत आहेत.

दरम्यान आज नाशिक बाजारसमितीत २०० क्विंटल शहाळ्याची आवक झाली. यावेळी क्विंटलमागे मिळणारा दर सर्वसाधारण ४००० रुपयांचा भाव मिळत आहे. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी गाडीवरून जाताना किंवा चालत जाणारे नागरिक नारळपाणी पिण्यास पसंती देतात. सध्या नाशिककरांना ६० ते ७० रुपयाला एक शहाळं मिळत असून मागील आठवड्यापासून नारळाची आवक १०० ते २०० क्विंटल होत आहे.

मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये शहाळ्याची आवक स्थिर होत असून दरही सर्वसाधारण ४००० रुपये मिळत आहे. काल पुण्यात ११२० क्विंटल शहाळ्याची आवक झाली होती. यावेळी क्विंटलमागे ७५० रुपयांचा भाव मिळाला. मागील काही दिवसांपासून किती शहाळं येतंय बाजारात? भाव काय मिळतोय?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/05/2024
नाशिक---क्विंटल200280050004000
24/05/2024
नाशिक---क्विंटल200280050004000
पुणेलोकलक्विंटल11205001000750
23/05/2024
नाशिक---क्विंटल100280050004000
पुणेलोकलक्विंटल10005001100800
22/05/2024
पुणेलोकलक्विंटल4605001100800
21/05/2024
नाशिक---क्विंटल200280050004000
20/05/2024
नाशिक---क्विंटल100280050004800
पुणेलोकलक्विंटल8003001000600
19/05/2024
नाशिक---क्विंटल200280050004000
पुणेलोकलक्विंटल14405001100800

टॅग्स :बाजारनाशिकपाणी