Join us

जागतिक हृद्य दिन; हार्ट अटॅक कशामुळे येतो? शेतकऱ्यांनो तुम्हाला हे माहित असायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 12:27 PM

हृदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक रक्त पंप करण्यात अपयशी ठरते आणि हृदयदोष त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, सर्वसाधारण लोकसंख्येच्या १.३ टक्के ते ४.६ टक्के लोकांच्या अंदाजानुसार, हार्ट फेल्युअर ही देशातील एक व्यापक स्थिती आहे.

हार्ट फेल्युअर हा एक आव्हानात्मक आजार आहे, जो भारतामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. काही कारणांमुळे सशक्त हृदयाच्या कार्यात किंवा रचनेत बदल, संक्रमण झाला, तर हृदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक रक्त पंप करण्यात अपयशी ठरते आणि हृदयदोष त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, सर्वसाधारण लोकसंख्येच्या १.३ टक्के ते ४.६ टक्के लोकांच्या अंदाजानुसार, हार्ट फेल्युअर ही देशातील एक व्यापक स्थिती आहे. या आजारासह त्याची कारणे, लक्षणे, निदान पर्यायांवर चर्चा करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवानो आपल्याला कामामुळे येणारा ताण तसेच इतर कौटुंबिक कारणामुळे येणारा ताण यामुळे आपल्यात अशी काही लक्षणे दिसली तर ताबडतोब आवश्यक त्या सर्व टेस्ट करून घ्या.

हार्ट फेल्युअरची कारणेरुग्णामध्ये हृदयावर परिणाम करणारे विविध घटक असतात. आपल्याकडील रुग्णांमध्ये आवळणारी कारणे म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्याचा विकार, व्हायरल मायोकार्डिटिस, उच्च रक्तदाब, मधुमेह, कार्डिओमायोपॅथी आणि अनियमित हृदयाचे ठोके शिवाय हृदयाला इजा किंवा ते कमकुवत झाल्यास हृदयाचे कप्पे ताणून मोठे होऊ शकतात. त्यामुळे हृदय आवश्यक प्रमाणात रक्त पंप करू शकत नाही.

हार्ट फेल्युअरची चिन्हे आणि लक्षणे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना अनेक लक्षणे असू शकतात. उदा. श्वास लागणे, झोपल्यावर खोकला येणे, हृदयाचे ठोके जलद वा अनियमित असणे, घोटे आणि पायाच्या नसांवर सूज येणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, थकवा आणि अशक्तपणा असणे अशी लक्षणे लवकरात लवकर ओळखून त्यांचे योग्य निदान आणि त्यावर उपचार सुरु करणे महत्त्वाचे ठरते.

निदान आणि तपासणीहार्ट फेल्युअरचे निदान करताना विविध तपासण्या कराव्या लागतात- प्राथमिक निदानासाठी वापरली जाणारी चाचणी म्हणजे इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) ही तपासणी तुमच्या हृदयाची विद्युत क्रिया रेकॉर्ड करते.- त्यानंतर 2D इकोकार्डियोग्राफी जी हृदयाच्या पंपिंग कार्यक्षमतेबद्दल माहिती देते.- याशिवाय फुफ्फुसाची कुठली समस्या श्वासोच्छवासास कारणीभूत आहे की नाही हे तपासण्यासाठी श्वासोच्या चण्यायामध्ये स्पायरोमेट्री आणि पीक फ्लो टेस्ट याचा समावेश होतो.- हृदय आवश्यकतेपेक्षा मोठे आहे की नाही हे तपासण्यासाठी किंवा फुफ्फुसात द्रव आहे का याच्या तपासणीसाठी छातीचा एक्स रे.

शेतकरी बांधवांनो आपल्याला कामामुळे येणारा ताण तसेच इतर कौटुंबिक कारणामुळे येणारा ताण यामुळे आपल्यात अशी काही लक्षणे दिसली तर ताबडतोब आवश्यक त्या सर्व टेस्ट करून घ्या. 

टॅग्स :शेतकरीआरोग्यहृदयविकाराचा झटकाहृदयरोग