Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

By बिभिषण बागल | Updated: August 17, 2023 14:41 IST

रानभाजी महोत्सवमध्ये कोरेगावातील तालुक्यातील आरोग्य प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांनी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी चुका, गुळवेल, करटुली, पाथरी, अंबाडी, केना, बांबू, तरोटा, केळफुल, अळू, पुदिना, ईसा, भारंगी अशा अनेक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्या खरेदी केल्या व माहिती घेतली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जागतिक स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरेगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. उद्घाटन आमदार महेशजी शिंदे कोरेगाव विधानसभा मतदार संघ होते.

रानभाजी महोत्सवमध्ये कोरेगावातील तालुक्यातील आरोग्य प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांनी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी चुका, गुळवेल, करटुली, पाथरी, अंबाडी, केना, बांबू, तरोटा, केळफुल, अळू, पुदिना, ईसा, भारंगी अशा अनेक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्या खरेदी केल्या व माहिती घेतली.

प्रस्ताविक ज्ञानदेव जाधव तालुका कृषी अधिकारी कोरेगाव यांनी केले. त्यावेळी त्यांनी रानभाज्या महोत्सव आयोजनाचा उद्देश सर्वांसमोर विशद केला. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (PMFME) योजनेची माहिती दिली. आमदार महेशजी शिंदे म्हणाले, रानभाज्यांना मानवी आरोग्यात अनन्यसाधारण महत्व आहे. 

निसर्गात उपलब्ध होणाऱ्या परंतु आपल्याला ओळख नसलेल्या व रोजच्या आहारात अनन्य साधारण महत्व असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व समजून सांगितले. कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विशेषज्ञ डॉ. भूषण यादगीरवार यानी सर्व रानभाज्या व रानफळांचे महत्वबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन सुजित शिंदे व आभार सुनील घनवट यांनी केले. त्याप्रसंगी माननीय आमदार महेश शिंदे साहेब यांच्या हस्ते उपस्थित रानभाज्या घेऊन आलेल्या शेतकरी यांचे प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित गट विकास अधिकारी किशोर माने तसेच सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सर्व मंडल कृषी अधिकारी, बीटीएम कोरेगाव, सर्व कृषी पर्यवेक्षक, सर्व कृषि सहाय्य्क उपस्थित होते. 

टॅग्स :शेतकरीशेतीसरकारस्वातंत्र्य दिनकृषी विज्ञान केंद्र