Join us

सातबारासाठी तलाठी कार्यालय कशाला? आता २५ रुपये मोजून...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 2:30 PM

कुठून कसा काढायचा सातबारा? काय कागदपत्रे लागतात? जाणून घ्या...

ई फेरफार प्रकल्पांतर्गत अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं. ७/१२, ८-अ संगणकीकृत करण्यात आले आहे. संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांची नक्कल फी शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार सेतू/ आपले सरकार सेवा केंद्र / महा-ई सेवा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.

अशी असेल सेवा शुल्काची विभागणी

महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार, सेतू सारख्या संस्थाकडून प्रचलित सेवाशुल्क आकारणी १५ रुपये अधिक ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क १० रुपये अशी राहील. सदरचे ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क हे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या कार्यालयातील स्वीय प्रपंजी लेखा खात्यात जमा करण्यात येतील. अतिरिक्त पृष्ठ असल्यास प्रतिपृष्ठ २ रूपये एवढे अतिरिक्त सेवा शुल्क केंद्रचालकास घेता येईल.

सातबारासाठी तलाठी कार्यालय कशाला?

आता सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालया जाण्याची आवश्यकता नाही, यात वेळ व पैशांची बचत होणार आहे.

आता ई-हक्क प्रणाली

७/१२, ८-अ चा दर दोनपृष्ठापर्यंत २५ रुपये ठेवण्यात आला आहे. त्यानंतर प्रतिपृष्ठ २ रुपये मोजावे लागतील.

ई सेवा केंद्रावर २५ रुपयांत सातबारा

यापूर्वी अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकांना तलाठी कार्यालयात समक्ष अर्ज कागदपत्रासह दाखल करावा लागत असे. आता ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कोणत्याही खातेदार नागरिकांना फेरफारसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोडकरून ई-हक्क प्रणालीद्वारे थेट संबंधित तलाठ्यांकडे दाखल करता येतात.

सातबारावरील इतर कामेही केंद्रातच

ई-करार, बोजा दाखल करणे / गहाण खत, बोजा कमी करणे, वारस नोंद आदीसंदर्भातील कामेही केंदात करता येणार आहेत.

कागदपत्रे काय लागतात?

सोसायटी ई-करार, बँकेची प्रत व गहाण खताची प्रत, वारस नोंद करण्यासाठी मृत्यू दाखला सत्यप्रत, अर्जदाराचे ओळखपत्र आदी कागदपत्रे लागतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी