Join us

Flatbed System : हायड्रोपोनिक शेतीतील फ्लॅटबेड सिस्टीम काय आहे? कसा होतो फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 6:15 PM

लेअर फार्मिंगचे फायदेसुद्धा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरत आहेत. 

संरक्षित शेती आणि कंट्रोल फार्मिंगकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत असून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. संरक्षित शेतीमध्ये पॉलिहाऊस, शेडनेट आणि ग्रीनहाऊसचा उपयोग केला जातो. बऱ्याचदा पॉलिहाऊसमध्ये शेतकरी लेअर फार्मिंग म्हणजेच थरांच्या शेतीचा वापर करून अधिक उत्पन्न घेत आहेत. तर लेअर फार्मिंगचे फायदेसुद्धा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरत आहेत. 

काय आहे फ्लॅटबेड सिस्टीम?या शेतीपद्धतीमध्ये जमिनीला समांतर तीन ते चार फूट उंचीचा हायड्रोपोनिकचा बेड असतो. हा हे जमीनीला समांतर आणि सपाट असल्यामुळे यामध्ये आपण पाण्याचे योग्य नियोजन करून शकतो. हायड्रोपोनिक शेतीमधीलच ही एक पद्धत असून केवळ पाण्यामधून खते आणि औषधे सोडता येतात. यामुळे मनुष्यबळ कमी होते आणि उंची असल्यामुळे कामगारांना खाली वाकून काम करावे लागत नाही. 

या पद्धतीमध्ये जमिनीवर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीमधून एकाच वेळी पाणी आणि खते पिकांना दिले जातात त्यामुळे सर्व पिकाला समान पद्धतीने खते आणि पाणी पोहोचते. हे पाणी कायम वाहते असल्यामुळे पाण्याचा रियुज म्हणजेच पुनर्वापर केला जातो. यामुळे पिकाला जेवढे पाणी गजरेचे आहे तेवढ्याच पाण्याचा वापर होतो. मातीतील शेतीमध्ये जवळपास ८० टक्के पाणी वाया जाते आणि केवळ २० टक्के पाणी पिकांना जाते. पण या पद्धतीमध्ये ८० टक्के पाण्याची बचत होते. त्याचबरोबर पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादन वाढते.

माहिती संदर्भ - प्रिया देवकर (शेतकरी)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी