Join us

शेतीसाठी हे खत वापरा आणि सेंद्रिय पीक पीकवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 11:16 AM

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ओल्या कचऱ्यापासून फुलंब्री नगरपंचायत महिन्याला दीड टन सेंद्रिय खताची निर्मिती करत आहे. हे खत आता विक्रीसाठी खुले करण्यात आले असून त्याचा दर ४ रुपये प्रति किलो  असणार आहे.

खतविक्रीचा प्रारंभ गुरुवारी माजी नगराध्यक्ष सुहास सिरसाट, पोलिस निरीक्षक संजय शाने, न. प. चे प्रशासक ऋषिकेश भालेराव, संजय मोरे, वाल्मीक जाधव, जफरोद्दीन चिस्ती यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताचे उत्पादन करावे अशी संकल्पना पुढे आली.

नगर पंचायतीने ५ घंटागाड्या एका कंपनीला भाडेतत्त्वावर दिलेल्या असून, यामधून शहरतील कचरा गोळा केला जातो. शहराची लोकसंख्या २५ हजारांवर आहे. त्यामुळे दररोज ३ टन कचरा शहरातून गोळा होतो. यात ओला, सुका व नाल्यातील कचऱ्याचा समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे.केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

शहरातील अनेक महिलांना रोजगार

• देवगिरी साखर कारखान्याजवळनव्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन संस्थांची नेमणूक केली आहे. यामध्ये ईको-सत्त्व या संस्थेच्या माध्यमातून शहरातील घरोघरी निर्माण होणारा कचरा जमा केला जातो. यासाठी नागरिकांना कचरा विलगीकरण कसे करावे, याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

• गोळा होणाऱ्या कचऱ्यावर व्यवस्थापन केंद्रात रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, खराब फळे, भाजीपाला, कागदाचे तुकडे, मुख्य बाजारपेठेतील दुकानांमधील विविध प्रकारचे पदार्थ आदींचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून श्रेडिंग मशीनच्या सहाय्याने खतनिर्मिती केली जाते.

टॅग्स :खतेमराठवाडाशेतीसेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्या