Join us

Union Budget 2025 : अर्थसंकल्पात महिलांसाठी केल्या आहेत 'या' महत्त्वाच्या घोषणा वाचा सविस्तर

By प्रतीक्षा परिचारक | Updated: February 1, 2025 17:24 IST

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प मांडला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प मांडला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmal Sitharaman) यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

यात विशेषत: महिला शेतकऱ्यांकडे (Women Farmer) सरकारचे विशेष लक्ष दिल्याचे सांगितले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याची प्रतिक्रिया निर्मला सीतारामन यांनी दिली.

अर्थसंकल्पात महिलांसाठी 'या' महत्वाच्या घोषणा

* दोन कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक महिलांना देण्यात येणार आहे.

* महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार.

* मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी ही योजना असून पाच लाख महिलांना योजनेचा लाभ होणार.

* महिलांना स्टार्टअपसाठी दोन कोटी रुपयांची मदत.

* इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार.

* सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना - आठ कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार.

* स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद.

* एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत.

* देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, एक लाख किशोरवयीन मुलींना  पोषणमूल्य वाढवणार.

* ईशान्य भारतातही विशेष लक्ष म्हणून पोषण मुल्य पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद

* सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमांतर्गत 8 कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरवणार.

* १ कोटी महिलांना आणि २० लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार.

* सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन पुरवणार.

* एससी एसटी महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. यासाठी ५ वर्षांसाठी ही योजना असणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी ५ लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Agricultural Pump : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा; किती शेतकरी लाभार्थी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रअर्थसंकल्प २०२५शेतकरीशेतीमहिलामहिला आणि बालविकास