Join us

कृषी व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे येणाऱ्या समस्यांवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:15 IST

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि जीएसटी सचिव पंकज कुमार यांची भेट संपन्न 

कृषी व्यापाऱ्यांनी जीएसटीमुळे येणाऱ्या समस्यांसंदर्भात ऑल इंडिया संघाच्या प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी, जीएसटी सचिव पंकज कुमार सिंह आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना कृषी व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे येणाऱ्या विविध समस्यांबद्दल माहिती दिली. 

यामध्ये पुराणे लेखापरीक्षणावरील दंड, तृतीय पक्ष दायित्वांची समस्या आणि खते व कीटकनाशके जीएसटीपासून मुक्त करण्यासंदर्भातील विनंत्या समाविष्ट होत्या.

पुढील बैठकीत गांभीर्याने विचार..

अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी आश्वासन दिले की जीएसटी काउंसिलच्या पुढील बैठकीत या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार केला जाईल आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. इतर समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी पुढील 15 जानेवारीला दोन चार्टर्ड अकाउंटंटांसह ऑल इंडिया संघटनेच्या प्रतिनिधीमंडळाला पुन्हा बोलावले जाईल आणि या सर्व मुद्द्यांवर पुन्हा विचार केला जाईल. त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन देण्यात आले.

या प्रतिनिधीमंडळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलन्त्री, पुरुषोत्तम खंडेलवाल, आबासाहेब भोकरे, अतुल त्रिपाठी कानपूर, सत्यनारायण कासट, सुभाष दरक, विपिन कासलीवाल, मधुकर मामडे, राजेंद्र भंडारी, संजय रघुवंशी उज्जैन, मनमोहन सरावगी बिहार इत्यादी समाविष्ट होते. 

टॅग्स :शेती क्षेत्रजीएसटी