धुळे : फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच धुळे शहरात उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे. दरवर्षी या काळात जाणवणारा गुलाबी गारवा यंदा पूर्णतः गायब झाला असून, ऐन हिवाळ्यात धुळेकरांना घामाघूम व्हावे लागत आहे. शहराचे कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तापमानात मोठी वाढ हवामान विभागाच्या नोंदीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी धुळ्याचे कमाल तापमान ३१.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११.४ अंश नोंदवले गेले.
असे होते तापमान
५ फेब्रुवारी रोजीही कमाल तापमान ३१.२ अंश आणि किमान तापमान ११.१ अंश इतके होते. विशेष म्हणजे, हिवाळ्यात अपेक्षित असलेले १८ ते २० अंशांचे किमान तापमान यंदा अद्याप नोंदवले गेलेले नाही. दरम्यान सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके तर रात्री पुन्हा - थंडी अशा वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
Web Summary : Dhule experiences an early heatwave as February temperatures soar to 31°C. The usual winter chill is absent, causing discomfort. Maximum temperature remains consistently high, raising concerns about public health amidst fluctuating weather patterns.
Web Summary : फरवरी में ही धुले में गर्मी का प्रकोप, तापमान 31 डिग्री सेल्सियस तक पहुंचा। गुलाबी ठंड गायब होने से लोग परेशान। अधिकतम तापमान लगातार बढ़ने से स्वास्थ्य संबंधी चिंताएं बढ़ रही हैं। मौसम में बदलाव से बीमारियां फैलने का डर।