Join us

मागणी वाढल्याने तांदळाच्या किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 23, 2024 14:44 IST

नव्या हंगामासाठी तांदूळ खरेदीची किंमत वाढवल्याने भारतातील तांदूळ निर्यात किंमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर

मागणी वाढल्याने आणि सरकारने नव्या हंगामासाठी तांदूळ खरेदीची किंमत वाढवल्याने भारतातील तांदूळ निर्यात किंमती या आठवड्यात जवळपास तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहेत.

भारताने बुधवारी शेतकऱ्यांकडून नव्या हंगामात सामान्य तांदूळ खरेदी करण्याची किंमत ५.४ टक्क्यांनी वाढवून २३०० रुपये प्रतिक्विंटल केली.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार,धानाच्या दरात वाढ झाल्यामुळे तांदळाच्या निर्यातीच्या किमतीही वाढतील. परदेशातील खरेदीदार आणखी खरेदी करतील असे व्यापारी सांगत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात पणन विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात बासमती तांदळाला ७००० ते १० हजारांपर्यंतचा भाव मिळत असून इतर लुचाई, चिनोर या जातींच्या तांदळाला २००० ते ५००० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.

काल (शनिवारी) १५०५ क्विंटल तांदळाची राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आवक झाली होती. यावेळी पुण्यात बासमती तांदळाला सर्वसाधारण ९९०० रुपयांचा भाव मिळाला. तर मसुरा ३३५०, कोलम ५९५०, रुपयांवर पोहोचला होता.

टॅग्स :भातबाजार