Join us

पुणे कृषी महाविद्यालयात महिला आरोग्य तपासणी आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 5:47 PM

विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली

पुणे : कृषी महाविद्यालय पुणे इथे लिवो फाउंडेशन संचलित आरोग्य आधार (भारत सरकार मान्यताप्राप्त, Certified ISO/IEC 27001) यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांचे मोफत आरोग्य विषयक तपासणी आणि महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे यांच्या आरोग्य नियमाअंतर्गत (कॅन्सर स्क्रिनिंग, स्त्रीरोग तपासणी, जनरल चेकअप, रक्त तपासणी, डोळे तपासणी, एच.पी.व्ही टेस्ट, मेंटल हेल्थ, हायजिन केअर आणि अवयवदान) सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी करण्यात आल्या.

 या कार्यक्रमात ४५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि महिला कर्मचारी यांनी सदर शिबिराचा फायदा घेतला. या शिबिरामध्ये आरोग्य आधार (भारत सरकार मान्यताप्राप्त, Certified ISO/IEC 27001), महा एफ.पी.ओ फेडरेशन, राष्ट्रीय सेवा योजना, माजी विद्यार्थी संघटना, गुप्ते हॉस्पिटल, एम.जे.एम हॉस्पिटल, जिविका हेल्थकेअर आणि इन्फिगो आय हेल्थकेअर यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी