Join us

देशात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरु; काय आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 8:35 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.

सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' जाहीर केली. या योजनेचे उद्दिष्ट १ कोटी घरांना दर महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरविणे आहे.

सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले, पुढील शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही 'पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना' सुरू करत आहोत. ७५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प, दर महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देऊन, १ कोटी कुटुंबांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने एक संकेतस्थळही तयार केले आहे.

नेमकी योजना काय?■ या योजनेद्वारे लोकांच्या बँक खात्यात थेट दिल्या जाणाऱ्या भरीव सबसिडीपासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल.■ देशभरात रूफटॉप सोलर सिस्टीमला अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल.■ या योजनेमुळे अधिक उत्पन्न, कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.

चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. पंतप्रधान यांनी सर्व ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ करण्‍याचे आवाहन करतो. त्यासाठी संकेतस्‍थळ पुढीलप्रमाणे आहे pmsuryagarh.gov.in लवकरच ही वेबसाईट सुरु होणार आहे.

टॅग्स :पंतप्रधाननरेंद्र मोदीकेंद्र सरकारसरकारसरकारी योजना