Join us

Pesticide : बुरशीनाशक खरेदी करताना घ्या खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:03 IST

Pesticide : जैविक बुरशीनाशक खरेदी करताना अधिकृत केंद्रातूनच खरेदी करा, असे आवाहन परभणी विद्यापीठाचे आवाहन

        जैविक बुरशीनाशकाची बोगसरीत्या तयार करून अवैधरीत्या विक्री होत असल्याचे प्रकार हिंगोली जिल्हयात उघडकीस आला आहे. जिल्ह्यात काही व्यक्तींकडून जैविक बुरशीनाशकाची बोगसरीत्या तयार करून अवैधरीत्या विक्री केल्याचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत केंद्रावरूनच जैविक बुरशीनाशकाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.         विनापरवाना विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले ''बायोमिक्स'' नावाचे जैविक बुरशीनाशक जमिनीतून पिकांना उद्भवणाऱ्या रोगावर चांगले परिणामकारक आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना विशेषतः हळद, अद्रक या कंदवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात उपयोग शेतकरी करत असतात.

येथे आहेत विक्री केंद्रे       वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून किंवा त्यांच्या अधिकृत विक्री केंद्रावर जैविक बुरशीनाशकाची विक्री केली जाते. कृषी महाविद्यालय गोळेगाव (ता. औंढा ना.), कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर (ता. कळमनुरी) येथे विक्री करण्यास परवानगी दिली आहे. याच अधिकृत केंद्रावरुन बुरशीनाशक खरेदी करावे. हे जैविक बुरशीनाशक दोनशे रुपये किलो याप्रमाणे विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे.  परंतु जिल्ह्यातील काही व्यक्ती या जैविक बुरशीनाशकाची बोगसरीत्या तयार करून अवैधरीत्या विक्री केली जात असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्री केंद्रावरूनच जैविक बुरशीनाशकाची खरेदी करावी. - राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :शेती क्षेत्रकीड व रोग नियंत्रण