Join us

कमी पाण्यात सुद्धा जीवंत राहतील फळबागा; असे करा नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:49 IST

फळबाग संशोधन केंद्राचा मोलाचा सल्ला

सध्या सगळीकडे प्रचंड तापमान असून वार्‍याचा वेग देखील अधिक प्रमाणात आहे. ज्याचा फळबाग सहित विविध पिकांवर मोठा परिणाम होतो जसे की, तापमान वाढल्यास बासपोर्जनाची प्रक्रिया जोरात होते. त्यामुळे झाडास पाण्याची आवश्यकता अधिक प्रमाणत भासते. तापमान वाढल्यास वार्‍याचा वेग वाढतो. चक्रिय वादळ निर्माण होते. झाडातील व जमीनीतील पाणी कमी होते.

या होणार्‍या परिणामांवर अशा वेळेस फळझाडांना व भाजीपाला पिकास अधिक पाणी उपलब्ध आहे म्हणुन आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी देणे टाळावे. तसेच पाण्याच्या पाळ्याचे अंतर आवश्यकतेनुसारच ठेवावे जसे की, थंडीमध्ये आठ दिवसाचे व उन्हाळयामध्ये सहा दिवसाचे अंतर ठेवावे. फळबाग पिकास प्लास्टिक अथवा सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.

भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी

उन्हाळयात झाडांच्या शरीरातील पाण्याचे अधिक तापमान व वार्‍याच्या वेगाने मोठया प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने झाडांतील पाणी कमी होत असते. यासाठी पोटॅशिअम नाइटरेट व कीओलिन सारखे रसायने वापरने फायदेशीर ठरते. शक्य असल्यास फळ झाडांची किंवा भाजीपाल्याची लागवड तापमान नियंत्रित कक्षामध्येच करावी. तसेच झाडांवरील फांद्या व पाणे १/३ पर्यंत कमी करावी.

अल्प पाण्यात फळव्यवस्थापन करतांना वेगवगळया ठिबक संचाचे मॉडेल वापरात आणावे ज्यात मटका ठिबक संच, प्लास्टिक बॉटलचा वापर, ठिबक संचाचा वापर व सब सरफेस एरिगेशनचा वापर करावा. 

डॉ. जी.एम. वाघमारे, प्रभारी अधिकारी, फळबाग संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर