इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ सेवानिवृत्ती योजना, विधवा सेवानिवृत्ती योजना, दिव्यांग सेवानिवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. ॲपद्वारे या योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची माहिती पडताळली जाते.
या योजनांसाठी लागते हयातीचे प्रमाणपत्र◼️ बेनिफिशरी सत्यापन Satyapan App ॲप म्हणजे एक मोबाइल किंवा वेब आधारित ॲप्लिकेशन आहे.◼️ विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांची ओळख व पात्रता पडताळण्यासाठी ॲप वापरले जाते.◼️ ॲप प्रामुख्याने सरकारी विभाग, अधिकारी किंवा शासकीय योजना राबविणाऱ्या संस्थांसाठी तयार केले आहे.◼️ यातून हयातीचे प्रमाणपत्र मिळवता येते.
ॲपचा वापर करता येणारॲपचा वापर केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय योजनांच्या लाभार्थी पडताळणीसाठी केला जात आहे. आधार सक्षम ई-केवायसी प्रमाणीकरण करता येते.
लाभार्थ्यांचे हेलपाटे टळणार◼️ बेनिफिशरी सत्यापन ॲप वापरून घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र मिळवणे शक्य आहे.◼️ यामुळे लाभार्थीस शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.◼️ हे ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आधार कार्ड वापरून प्रमाणपत्र मिळते.◼️ आधार क्रमांक टाकून ॲपवर फेस ऑथेंटिकेशन करता येते.
ॲप कसे डाउनलोड कराल?आधार फेस आयडी आणि बेनिफिशरी सत्यापन ॲप गुगल पे स्टोअर किंवा ॲप स्टोअर डाऊनलोड करता येते. आणि आधार कार्डने प्रमाणपत्र मिळते. (ॲपची सुरक्षितता खात्री करूनच डाउनलोड करा)
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही