Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:36 IST

light bill kapat महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षांकरिता दरात कपात केली.

मुंबई : महावितरणच्यावीज दर निश्चिती प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षांकरिता दरात कपात केली.

त्यानुसार, १ एप्रिलपासून १ ते १०० युनिटपर्यतचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता ७ रुपये ३१ पैसे ऐवजी ७ रुपये १० पैसे प्रति युनिट दराने विजेची बिले येणार आहेत.

महावितरणच्या पाच वर्षाच्या वीज दर याचिकेवर आयोगाने आदेश दिला आहे. त्यानुसार, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांसाठीचे दर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होतील.

उद्योगांना दिलासा◼️ उद्योगांना व व्यावसायिक ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत सुरूच राहणार आहे.◼️ एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत या ग्राहकांना मिळणार आहे.◼️ उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत सवलतीच्या दराने वीज मिळेल.◼️ उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठी दर १० रुपये ७८ पैसे यावरून १० रुपये ७१ पैसे इतका होईल.

युनिट वापरजुने दर (₹/युनिट)नवे दर (₹/युनिट) (१ एप्रिलपासून)
१-१००७.३१७.१०
१०१-३००१३.१७१२.९४
३०१-५००१७.५६१७.३५
५०० पेक्षा जास्त१९.१५१९.१४

स्मार्ट मीटर धारकांना लाभस्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील वीजवापराकरिता प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती. आता ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल.

फिक्स्ड चार्जमध्ये वाढ◼️ २०२५-२६ मध्ये १३० रुपये.◼️ २०२६-२७ मध्ये १३५ रुपये.◼️ २०२७-२८ मध्ये १४० रुपये.◼️ २०२८-२९ मध्ये १४० रुपये.◼️ २०२९-३० मध्ये १४५ रुपये.

अधिक वाचा: शेतरस्त्यावर अतिक्रमण किंवा शेतरस्ता आडवणे पडणार महागात; होणार आता 'ही' शिक्षा

English
हिंदी सारांश
Web Title : Lower Electricity Bills Coming: New Rates from April 1st Explained

Web Summary : Maharashtra electricity rates reduced for next five years. Users consuming 1-100 units will pay ₹7.10/unit instead of ₹7.31 from April 1st. Industries get TOD concessions. Smart meter users get increased discounts. Fixed charges will increase gradually till 2030.
टॅग्स :वीजमहावितरणसरकारराज्य सरकार