Join us
Daily Top 2Weekly Top 5

येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचे नवे दर जाहीर; आता उसाला हेक्टरी किती कर्ज मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:46 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. सोयाबीन, द्राक्ष, हरभरा, कापूस, ऊस या पिकांच्या कर्जमर्यादेत गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

श्रीरामपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.

सोयाबीन, द्राक्ष, हरभरा, कापूस, ऊस या पिकांच्या कर्जमर्यादेत गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने निश्चित केलेल्या नव्या दरानुसार सोयाबीनसाठी सुमारे ५९ हजार रुपयांपर्यंत, तर उसासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत पीककर्जाची मर्यादा राहील.

विविध बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात येतो. एक वर्षांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी देण्यात येते.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणावर पीककर्ज देण्यात येते.

सुधारित दराचा आधार◼️ पीककर्जाची मर्यादा पिकानुसार निश्चित केली जाते.◼️ यावर्षी पीककर्ज वाटपाच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना मोठा आधार देण्यात आला.◼️ सुधारित दरांमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी अधिकचे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.

पीक कर्जाच्या मर्यादेत वाढ◼️ गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जमर्यादित १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.◼️ बियाणे, खते, मजुरी आणि इतर खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्नधान्य व कडधान्य दरात वाढ◼️ सोयाबीन आणि मका यासारख्या पिकांच्या मर्यादितही वाढ करण्यात आली आहे.◼️ सोयाबीनसाठी आता ५९,४०० रुपयांपर्यंत, तर बागायत मक्यासाठी ४९,५०० रुपयांपर्यंत कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.◼️ जिल्ह्यात सोयाबीन आणि उसाचे क्षेत्र जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हळदीला तरतूद◼️ हळदीसारख्या मसाला पिकासाठी १ लाख ४८ हजार ५०० रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.◼️ मसाला पिकांचा उत्पादन खर्च अधिक असल्याने ही वाढ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

फळबागांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ◼️ केळीच्या बागेला १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ सुचविण्यात आली आहे.◼️ सोयाबीन : हेक्टरी ७५ हजार रुपये.◼️ ऊस : हेक्टरी १ लाख ८० ते १ लाख ९० हजार.◼️ कापूस : ८५ हजार प्रति हेक्टर.◼️ हरभरा : ६० हजार प्रति हेक्टर.

अधिक वाचा: यंदा माणदेशी ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट; वाचा प्रतिकिलो काय दराने होतेय विक्री?

English
हिंदी सारांश
Web Title : New crop loan rates announced for Kharif and Rabi seasons.

Web Summary : Maharashtra announces increased crop loan limits for farmers, up to 25% higher than last year. Sugarcane loans can reach ₹2.5 lakh per hectare, benefiting soybean, cotton, and horticulture farmers with crucial capital for planting.
टॅग्स :पीक कर्जपीकऊसकापूसहरभराबँकखरीपरब्बी हंगामराज्य सरकारसरकार