Join us

Vice Chancellor PG Patil : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 08:54 IST

ते मागच्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Dr. P. G. Patil passes away : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील यांचे आज पहाटे निधन झाले. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातील रूबी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांचे पार्थिव पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी सांगली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये ते राहुरू कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू झाले होते. कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालये, विभागीय संशोधन केंद्रे यांना चालना देण्याचे काम केले. 

त्यांनी संशोधनामध्ये तब्बल २७ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले आहे. या सोबतच २७ रिसर्च पेपर, ४ पुस्कके, १४ बुक चॅप्टर, १५ ट्रेनिंग मॅन्युअल, २७ तांत्रिक बुलेटिन प्रकाशित केलेले आहेत. याआधी त्यांनी आयसीएआरचे संचालक, ICAR-CIRCOT चे हेड, शास्त्रज्ञ, सीसीआयचे सल्लागार या पदावर काम केले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्र