Agriculture Minister : राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर झाला असून मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक विभागाला स्वतंत्र मंत्री मिळाले आहेत. तर यामध्ये माणिकराव कोकाटे हे राज्याचे नवे कृषीमंत्री झाले आहेत.
माणिकराव कोकाटे हे सिन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री असून त्यांची आमदारकीची ही सहावी टर्म आहे. त्यांना नाशिक जिल्ह्यातील दूरदृष्टीचा नेता समजले जाते. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांना साडेतेरा हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतला होता.
त्यांनी याआधी नाशिक जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नाशिक जिल्हा देखरेख संघाचे चेअरमन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे.
कुणाला मिळाले कोणते खाते?
देवेंद्र फडणवीस - गृहअजित पवार - अर्थएकनाथ शिंदे - नगर विकास, गृह निर्माण
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा7.गणेश नाईक – वन8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय20.अदिती तटकरे – महिला व बालविकास21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम22.माणिकराव कोकाटे – कृषी23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन25.संजय सावकारे – कापड26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय27.प्रताप सरनाईक – वाहतूक28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे31.आकाश फुंडकर – कामगार32.बाबासाहेब पाटील – सहकार33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
34.माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण35.आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय36.मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा37.इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन38.योगेश कदम – गृहराज्य शहर39.पंकज भोयर – गृहनिर्माण,