Join us

MCDC : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 20:29 IST

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेपासून ते त्रिस्तरीय पतसंरचनेतील शिखर संस्था यांना NCEL चे सभासदत्व मिळणार आहे. सद्यस्थितीत देशभरातून सुमारे ५५०० संस्थांनी NCEL या संस्थेचे सभासदत्व घेतले आहे.

Pune : राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या सेंद्रीय उत्पादनांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या निर्यातीसाठी आता राज्य सरकारने सहकार विकास महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून घोषित केले आहे. यामुळे राज्य सरकार आणि या संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे काम एमसीडीसीकडून करण्यात येणार आहे.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या आणि स्थानिक गरजा भागवून अतिरिक्त उत्पादीत होणाऱ्या वस्तु आणि सेवांना निर्यातीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणे हे NCEL चे प्रमुख उद्दीष्ट आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेपासून ते त्रिस्तरीय पतसंरचनेतील शिखर संस्था यांना NCEL चे सभासदत्व मिळणार आहे. सद्यस्थितीत देशभरातून सुमारे ५५०० संस्थांनी NCEL या संस्थेचे सभासदत्व घेतले आहे.

दरम्यान,राज्यातील सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण करणे, उत्पादनांचे परीक्षण करण्यासाठी आवश्यक त्या प्रयोगशाळांची निर्मिती हे काम करण्यासाठी राज्य शासन आणि राष्ट्रीय सहकार सेंद्रिय संस्था यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी आणि आवश्यक ते सामंजस्य करार करण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या संस्थेस नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे.

त्याबरोबरच राज्यातील प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्थांनी अथवा त्यांच्या सभासदांनी कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांची निर्यात राष्ट्रीय सहकार निर्यात संस्था यांच्यामार्फत करण्यासाठी राज्य शासन आणि राष्ट्रीय सहकार निर्यात संस्था यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे या संस्थेला नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्र