Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vay Vandana Card : वय वंदना कार्ड काढले का? सत्तरीपार ज्येष्ठांसाठी १० लाखांचे 'आरोग्यकवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:36 IST

Vay Vandana Card : सत्तरीपार ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. 'वय वंदना' योजनेअंतर्गत आता दरवर्षी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे. कॅशलेस आणि पेपरलेस या योजनेमुळे हजारो ज्येष्ठांना महागड्या उपचारांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.(Vay Vandana Card)

Vay Vandana Card : ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन केंद्र शासनाने 'वय वंदना' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.(Vay Vandana Card)

या योजनेअंतर्गत ७० वर्षांवरील नागरिकांना दरवर्षी तब्बल १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सत्तरीपार नागरिकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरत असून, बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ज्येष्ठांना याचा लाभ मिळणार आहे.(Vay Vandana Card)

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा मिळते. मात्र वाढते वय, गंभीर आजार आणि महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च लक्षात घेता 'वय वंदना' कार्डधारकांसाठी ही मर्यादा दुप्पट करून १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे.(Vay Vandana Card)

ही योजना पूर्णपणे कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येत आहे. शासनमान्य सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. त्यामुळे नागरिकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.(Vay Vandana Card)

गंभीर आजारांवरही उपचार

या योजनेत हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकार यांसारख्या गंभीर आजारांसह विविध महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उच्च दर्जाचे उपचार सहज उपलब्ध होणार आहेत.

घरबसल्या कार्ड काढण्याची सुविधा

नागरिक ऑनलाइन पोर्टल किंवा अधिकृत ॲपच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घरबसल्या 'वय वंदना' कार्ड तयार करू शकतात. याशिवाय महाआरोग्य शिबिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेतू सुविधा केंद्र आणि अधिकृत किऑस्क येथेही कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात विशेष मोहीम

बुलढाणा जिल्ह्यात या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हजारो ज्येष्ठ नागरिकांनी आधीच नोंदणी केली असून, उर्वरित पात्र नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

'वय वंदना' योजना ही सत्तरीपार नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने मोठे सुरक्षा कवच ठरत असून, शासनाच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

अधिकाऱ्यांचे आवाहन

ज्येष्ठ नागरिकांनी 'वय वंदना' कार्ड नक्की काढावे. या योजनेमुळे महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी होईल.- डॉ. अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी  

घरबसल्या असे बनवा वय वंदना कार्ड ? 

ऑनलाइन पोर्टल किंवा अधिकृत ॲपद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नागरिक घरबसल्या वय वंदना कार्ड तयार करू शकतात.

हे ही वाचा सविस्तर : Ayushman Bharat health scheme : 'आयुष्मान भारत' आणि 'आभा' कार्ड एकच नाही; जाणून घ्या नेमका काय फरक

अधिक वाचा : Harbhara Market :हरभऱ्याची आवक वाढली; एप्रिलमध्ये भाव किती मिळणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Vay Vandana Card: Health Coverage of ₹10 Lakhs for Seniors

Web Summary : The central government's Vay Vandana scheme offers ₹10 lakhs in free medical treatment annually for citizens over 70. This cashless, paperless initiative covers serious illnesses and surgeries, accessible via online portals, camps, and healthcare centers. Buldhana district is actively promoting the scheme to benefit its senior residents.
टॅग्स :शेती क्षेत्रसरकारसरकारी योजना